सह्याद्री व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

राजुर /प्रीतनिधी
येथील अभिनव शिक्षण संस्थेच्या सह्याद्री व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले. मशाल प्रज्वलन करून व क्रीडांगणामध्ये श्रीफळ वाढवून झाले.क्रीडा स्पर्धेचे यावेळी अध्यक्षस्थानी अभिनव शिक्षण संस्थेचे पदाधिकारी विक्रम नवले हे होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अनेक खेळ खेळत वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी व्हावे शाळेचे नाव उज्वल करावे, शिक्षणाबरोबरच विविध कलागुण अंगी जोपासावी असे आव्हाहन यावेळी त्यांनी केले.
व्यासपीठावर शाळेच्या प्राचार्या स्मिता पराड, पोलीस हेड कॉन्स्टेबल फटांगरे, पोलीस कॉन्स्टेबल डगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरवात करत मशाल प्रज्वलन करण्यात आली विद्यार्थ्यांनी यावेळी परेड करत ध्वज वंदना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध गुण दर्शन करत फ्लॉवर ड्रिल, योगा, लेझिम आदी नृत्य प्रकार सादर केले.
मोबाईल हे व्यसन जोडले जात आहे .त्यापासून दूर राहा पुस्तके वाचून देशाचे आदर्श नागरिक बना.त्यासाठी जिद्द मेहनत व चिकाटी ठेवून अभ्यास करा . क्रिडागणावर किमान एक तास घालवा त्यातून तुमच्यातील खेळाडू निर्माण होईल ,देशासाठी खेळा व देशाचे ,कुटुंबाचे आपल्या गुरुजनांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर न्या .असे प्रतिपादन राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांनी केले.
या कार्यक्रमास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास आशिष हंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली , क्रीडा शिक्षिका मुक्ता वाकचौरे, मनीषा सोनवणे, दीप्ती लहामगे, नंदकिशोर क्षिरसागर, वंदना आरोटे, मयुर वाकचौरे, कल्पना सुकटे, सुवर्णा शिंदे, अर्चना साबळे, योगिता कहाने आदी शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा पाटील यांनी केले.
