कर्तव्य सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन लागते – बाबूलाल पटेल

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
समाज जोपर्यंत मोठ म्हणत नाही, तोपर्यंत माणूस मोठा होत नाही. मोठ म्हणण्यासाठी समाजाच्या नजरेत़ील चाकोरीत बसण्यासाठी निस्वार्थ भावनेने निष्कलंकित एकनिष्ठ समाजकार्य करावे लागते. या सर्व गोष्टी कर्तव्यातून सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावे लागते. तोच धागा ज्यांनी पकडला त्यांना समाज डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही.असे मत भातकुडगाव फाटा परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबुलाल भाई पटेल यांनी मांडले
तालुक्यातील शेवगाव – नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा नजीक असणाऱ्या श्रीक्षेत्र स्वयंभू काळेश्वर देवस्थानच्या प्रांगणात आयोजित माजी सरपंच शंकरराव नारळकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळया प्रसंगी ते बोलत होते.सामाजिक धार्मिक क्षेत्रा बरोबरच इतरही क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटून समाज मनात आदराचे स्थान निर्माण केले. शेतकरी कष्टकरी विद्यार्थी व्यापारी धरणग्रस्त यांच्या विविध प्रश्नावर झालेल्या न्याय हक्कासाठीच्या लढ्यात नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.म्हणूनच सामान्य लोकांना ते आपलेसे वाटतात.
यावेळी काळेश्वर देवस्थानचे मठाधिपती कराळे महाराज,कामधेन पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, शेतकरी बचाव जन आंदोलनाचे अध्यक्ष एकनाथ काळे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबुलालभाई पटेल,भातकुडगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष सचिन फटांगरे, भातकुडगाव फाटा व्यापारी संघटनेचे राजेश लोंढे, अनिल भेंडेकर,अमोल वडणे, संजय आहेर, कल्याण सांवत, सोपान नजन, बापुसाहेब कुटे, विजय नजन, संतोष आहेर, महेश काळे, शेषेराव काळे, बाळकृष्ण टोगे, सुधाकर गरड, पांडुरंग गडाख, सचिन पानसंबळ, अशोक साबळे, देवदान वाघमारे, रामेश्वर उभेदळ, दत्ता गोसावी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार आर आर माने यांनी केले.तर आभार राजेश लोढे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार शहाराम आगळे यांनी केले.
लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्यापासून घुले कुटुंबातील सर्वांचे श्रद्धास्थान असलेले श्री काळेश्वर देवस्थानच्या विकास कामात माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा सिंहाचा वाटा आहे.अशा देवस्थानच्या नियोजनात माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच शंकरराव नारळकर यांचाही सहभाग मोलाचा आहे. ते करत असलेले काम परिसरातील सर्वांनाच प्रेरणादायी आहे.बाळासाहेब काळे
कामधेनु पतसंस्था भातकुडगाव फाटा