पारनेरला शनिवारी अजितदादांचा मेळावा!

पारनेर : प्रतिनिधी
पारनेर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मातब्बरांनी राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. येत्या शनिवार दि. १९ ऑक्टोबर रोजी पारनेर बाजार तळावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा होणार आहे हा मेळावा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने होणारा असल्याने या मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
या मेळाव्याच्या संदर्भात पारनेर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेसाठी दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, उत्तर जिल्हाध्यक्ष कपिल पवार, ज्येष्ठ नेते काशिनाथ दाते सर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, माजी नगराध्यक्ष विजय औटी, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, वसंतराव चेडे अदि पदाधिकारी उपस्थित होते. पारनेर येथे अजित पवारांच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा पक्षाचा घटक आहे. पारनेर ची जागा राष्ट्रवादी पक्षाला राहील. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर कै. मा .आ. वसंतराव झावरे, कै. गुलाबराव शेळके, कै. मार्तंड नाना पठारे, कै. बाबाशेठ कवाद, कै. पोपट पवार यांनी काम केले. या नेत्यांना मानणारा मोठा वर्ग या तालुक्यात आहे. आदरणीय वसंतराव झावरे बरोबर दाते सरांनी काम केले, सुजित पाटील यांनी काम केले, विजुभाऊ आहेत माधवराव लामखडेंनी राष्ट्रवादीत काम केले, हे सर्वांनी अजित दादांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणाचीही शिफारस न मानता अजित दादा जनतेतून जे नाव समोरील त्यांना उमेदवारी मिळेल. सर्वांनी एकत्र काम करा न्याय सर्वांना मिळेल हा दादांचा शब्द आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षप्रमुख अजितदादा पवार यांचा शनिवारी १९ तारखेला पारनेरला मेळावा होणार असल्याने पक्षातील नव्या जुन्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची आव्हान जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी केले आहे. पारनेर तालुक्यात परिवर्तनाची लाट आल्याशिवाय राहणार नाही. गावोगावी जाऊन राष्ट्रवादी पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकत्र करणार असल्याचेही सावंत म्हणाले.
व्यासपीठावर जुनीच राष्ट्रवादीची मंडळी आहे. या सभेला अनन्यसाधारण महत्त्व असून, अजित दादांना पारनेर तालुका नवीन नाही. आम्ही एकत्र आलो ही एका रात्रीतून घडलेली गोष्ट नसून अनुभवातून झालेला त्रास, मूळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दूर ठेवले जाते. त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. मधल्या काळात पाणी आडवाच्या संदर्भात ठळक काम झाले नाही.
सुजित झावरे पाटील, मा. उपाध्यक्ष जि.प. अहिल्यानगर
अजित दादा जो उमेदवार देतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय आम्ही मुंबई बैठकीत मान्य केला. अजित दादांना कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा असल्याने राज्यातील पहिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महायुतीचा मेळावा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत होईल. मतदार संघातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे :
काशिनाथ दाते सर, मा. सभापती बांधकाम व कृषी समिती जि. प. अहिल्यानगर.
सत्य जनतेसमोर आले पाहिजे, पारनेर तालुक्यात दहशत चालू आहे, ती थांबवण्याची गरज आहे, दादांनी आम्हाला काही प्रश्न विचारले त्याची उत्तरे आम्ही दिली. मागच्या निवडणुकीत दादांच्या विचाराचे लोकप्रतिनिधी निवडून आले. अर्थमंत्री म्हणून तालुक्याला जो निधी दिला त्याचा योग्य वापर झाला का? यापुढे अजित दादांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ
:विजय औटी माजी नगराध्यक्ष नगरपंचायत पारनेर.