इतर

भायगाव येथे पत्रकार शहाराम आगळे यांच्यावर कोयत्याने वार!


शेवगाव प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील भायगाव येथील गट नंबर २४५/१/२मध्ये जाण्या येण्यासाठी असणाऱ्या वहिवाटीच्या रस्त्यावरील अतिक्रमण व उर्वरित रस्ता खुला करण्यासाठी शेवगाव तहसीलदार यांच्याकडे २९/ ०४ / २०२२ रोजी रस्ता केस क्रमांक /रस्ता / एस आर /२७/२०२२रोजी दाखल करण्यात आलेली आहे. त्यानुसार ९/११/२०२२ रोजी माननीय तहसीलदार छगन वाघ साहेब यांनी देवटाकळी सजेचे कामगार तलाठी प्रदीप मगर
यांच्या समक्ष संबंधित रस्त्याचे स्थळ निरीक्षण करून पंचनामा केला. व त्या नुसार पुढील कारवाईसाठी ११/१/२०२३ रोजी पुढील कारवाईसाठी तारीख देण्यात आली. या तारखेला तुम्ही हजर राहायचे नाही. असे अन्यथा तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देत बाबुराव लक्ष्मण सामृत व विजय बाबुराव सामृत यांनी दत्तू चंद्रभान आगळे व संगीता दत्तू आगळे यांना काठी व दगडाने मारहाण केली. यावेळी पत्रकार शहराम चंद्रभान आगळे यांनी संबंधित रस्ता केस तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार साहेब यांच्यासमोर चालू आहे. तुम्ही आमच्याशी वाद घालू नका. असे बोलत असतानाच बाबुराव लक्ष्मण सामृत व विजय बाबुराव सामृत यांनी शहाराम यांनाही मारहाण करून डोक्यात कोयत्याने वार केला. शहाराम आगळे यांच्यासह त्यांच्या पत्नी सविता यांनाही मारहाण करून जखमी केले व शहाराम, सविता, दत्तू व संगीता यांनी शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन शेवगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल लबडे हे करीत आहेत. या घटनेचा शेवगाव तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाने निषेध केला आहे.


यापूर्वीही झाला होता प्राणघातक हल्ला


मी स्वतः व बक्तरपुर येथील शेतकरी भाऊराव उर्फ लिंबाजी जाधव व भायगाव येथील शेतकरी अशोक नेव्हल यांना बरोबर घेऊन २०११ पासून भायगाव बक्तरपुर शिव रस्ता खुला करण्यासाठी शासन दरबारी कागदपत्रांची पूर्तता करून उपोषणे केली. याचीच दखल घेऊन तत्कालीन शेवगावचे तहसीलदार विनोद भामरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भायगाव- बक्तरपुर शिव रस्ता अर्धा खुला करण्यात यश आले होते. मात्र काही बड्या शेतकऱ्यांनी याला विरोध केल्यामुळे हा रस्ता अर्धाच खुला झाला होता. या शिवरस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या पैकी काही व्यक्तीने मनात राग धरून त्यावेळी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला होता. याचीही शेवगाव पोलीस स्टेशनला नोंद आहे. याच शिवरस्त्यावर अतिक्रमण असणाऱ्यां व्यक्तीने शिवरस्ता पुढाकार घेऊन बातम्या प्रसिद्ध केल्या याचा राग मनात धरून गट नंबर २४५/१/२मध्ये पूर्वीपासून वहिवाटीचा जाण्या येण्यासाठी असणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करून अर्धा रस्ता बंद केला आहे. या संदर्भात शेवगाव तहसील मध्ये कार्यवाही चालू आहे. या रस्ता केस संदर्भात ११ जानेवारी २०२३ ला होणाऱ्या सुनावणी वेळी हजर राहू नका अन्यथा तुमचे बरे वाईट करेल अशी धमकी देऊन माझ्यासह माझ्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली.या संदर्भातसंपूर्ण माहिती शेवगाव पोलीस स्टेशनला मी समक्ष हजर राहून दिली आहे. व सध्या माझ्या डोक्याला जखम असल्यामुळे मी ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथून उपचार घेत आहे.

शहाराम आगळे
ग्रामीण पत्रकार भायगाव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button