योग्य नियोजन केल्यास पोल्ट्री व्यवसायात शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो- डॉ.मोहनगीरी

अकोले प्रतिनिधी
कुकुट पक्षाचे आयुष्य 40/45 दिवसांचे असते 1ते 15 दिवस लहान पक्षाची अतीशय चांगली काळजी घ्यावी नंतर वेळोवेळी खाद्य पाणी औषधे द्यावीत पडद्या चे योग्य नियोजन करावे जेणेकरून उन वारा पाऊस शेड मध्ये येणार नाही याची काळजी घ्यावी योग्य नियोजन केल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो असे उर्जा कंपनी चे प्रतिनिधी डॉ.मोहनगीरी यांनी सांगितले

अकोले संगमनेर तालुका पोल्ट्री योद्धा असोसिएशन चे वतीने उर्जा कंपनी ची मुळा परिसरात पोल्ट्री व्यावसायिक यांच्या समवेत ऊर्जा कंपनीची बैठक आंभोळ येथे संपन्न झाली
या वेळी उर्जा कंपनी चे डाॅ.मोहनगीरी साहेब HR.कुनालशेलार .घोडेकर साहेब.यादव साहेब यांनी कंपनी विषयी फार्मरांना मार्गदर्शन केले
या वेळी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख ,कार्याध्यक्ष बाळासाहेब कानवडे तालुका संचालक मेजर सचिन घोलप ,भाऊसाहेब साबळे.,किसन पिचड ,सरपंच लक्ष्मण कोरडे, मांडे साहेब कैलास थटार ,वर्षाताई चौधरी, व शेतकरी फार्मर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
शेवटी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी संघटनेचे महत्त्व पटवून दिले व सर्वांचे आभार मानले.