आजचे पंचांग व राशिभविष्य दि.23/07/2024

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण ०१ शके १९४६
दिनांक :- २३/०७/२०२४,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०६,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- व्दितीया समाप्ति १०:२४,
नक्षत्र :- धनिष्ठा समाप्ति २०:१८,
योग :- आयुष्मान समाप्ति १४:३५,
करण :- वणिज समाप्ति २०:५७,
चंद्र राशि :- मकर,(०९:२०नं. कुंभ),
रविराशि – नक्षत्र :- कर्क – पुष्य,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- कर्क,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०७:४३ ते ०९:२० पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५८ ते १२:३६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:३६ ते ०२:१३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:५१ ते ०५:२८ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
भा. श्रावण मासारंभ, भद्रा २०:५७ नं., मृत्यु २०:१८ नं., तृतीया श्राद्ध,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
आजचा दिवस सुखाचा जावो मन प्रसन्न राहो!!!!!
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण ०१ शके १९४६
दिनांक = २३/०७/२०२४
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
शांत राहून कामे करावीत. घरात बौद्धिक चर्चा होईल. नोकरीत बढतीचे योग आहेत. कार्यालयीन वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस.
वृषभ
घरासाठी खर्च करण्याची तयारी ठेवा. बोलण्यातून इतरांची मने सांभाळून घ्याल. मानसिक शांतता लाभेल. कामात गतीमानता येईल. घरगुती प्रश्न मार्गी लावाल.
मिथुन
उत्तम गुंतवणूक कराल. जवळच्या व्यक्तीचा सल्ला घ्याल. मित्रांशी मतभेदाची शक्यता. कामे वेळेत पूर्ण होतील. चमचमीत पदार्थांचा आस्वाद घ्याल.
कर्क
अचानक धनलाभाची शक्यता. मानसिक संतुलन सांभाळा. मुलांकडून चांगले सहकार्य मिळेल. नवीन माहिती शोधण्यात वेळ घालवाल. नकारात्मक विचार दूर ठेवा.
सिंह
ठरवलेल्या गोष्टी पुढे ढकलू नका. जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ होईल. घरात मंगल कार्याच्या योजना आखल्या जातील. मनोबल वृद्धिंगत होईल. मानसिक शांतता व प्रसन्नता वाढेल.
कन्या
मनातील इच्छेवर ठाम राहाल. घरात शांतता नांदेल. कामातून मनाजोगे समाधान मिळेल. मुलांना नवीन गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करा. प्रकृतीची हेळसांड करू नका.
तूळ
दिवस मजेत जाईल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे फार लक्ष देऊ नका. घरगुती गोष्टीत तडजोड करावी लागेल. कामाच्या ठिकाणी शब्दाला मान मिळेल.
वृश्चिक
शांत राहून कामाची पावती मिळवा. घरगुती खर्चाचा पुनर्विचार करा. व्यायामाची आवड लावून घ्या. मुलांवरील खर्च वाढू शकतो. हातातील कामात यश येईल.
धनू
धार्मिक ग्रंथांचे वाचन वाढेल. चटकन नाराजी दर्शवू नका. गुंतवणुकीला चांगला वाव आहे. प्रवासाचे योग संभवतात. वरिष्ठांची मर्जी राखावी.
मकर
आवडी बाबत अधिक दक्ष राहाल. आरोग्याविषयी हलगर्जीपणा करू नका. खाद्य पदार्थांची रेलचेल राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखादे परिवर्तन चांगले असेल.
कुंभ
दिवस आनंदात घालवाल. जोमाने कामे करत राहाल. भागिदारीतून चांगले उत्पन्न मिळेल. योजलेल्या गोष्टी सुरळीत पार पडतील. क्षुल्लक गोष्टीवरून वाद घालू नका.
मीन
मन शांत ठेवून निर्णय घ्या. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. फार विचार करत बसू नका. चटकन आपले मत मांडू नका. बचतीच्या योजना आमलात आणा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर