जामगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन

राजूर प्रतिनिधी
राजूर येथील ॲड एम. एन. देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर दि. ८ ते १४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान जामगाव, ता. अकोले येथे आयोजित करण्यात आले आहे,अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी दिली आहे.
शिबिराचा मुख्य विषय “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व माझी वसुंधरा” असा असून शिबिराचे उद्घाटन मंगळवार दि. ८ फेब्रुवारी२०२२रोजी दुपारी ३ वा. राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.नरेंद्र साबळे साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी जामगाव च्या माजी सरपंच सौ.उषाताई पारधी या असणार आहेत. या प्रसंगी मा. श्री. टी.एन.कानवडे( सचिव, सत्यनिकेतन संस्था, राजूर) श्री मिलिंदजी उमराणी (सहसचिव ) हे प्रमुख मान्यवर व प्रकाश महाले (माजी उपसरपंच जामगाव) ग्रामपंचायतीचे प्रशासकिय अधिकारी मा.चव्हाण साहेब, ग्रामसेवक एच. एन. दातीर हे उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात वृक्ष संवर्धन व पर्यावरण जागृती, रस्ते दुरुस्ती व ग्रामस्वच्छता, श्रम साक्षरता, कोविड जनजागृती, एड्स जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन, गटचर्चा, आरोग्य सर्वेक्षण, जलसंधारण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच शिबिरातील व्याख्यानमालेत डॉ. आर. व्ही. शिंदे(वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, विठे), ॲड. रंजना गवांदे (अंधश्रद्धा निर्मूलन समिति), प्रा. डॉ. संदीप वाकचौरे(ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ), मा. विनय सावंत (सामाजिक कार्यकर्ते), मा. डी. डी. पडवळेसाहेब (वन्यजीव अधिकारी, वनपरिक्षेत्र, राजुर) आदी तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत. अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजेंद्र सोनवणे प्रा. बबन पवार प्रा. डॉ. दीपमाला तांबे प्रा. संतोष अस्वले प्रा. नितीन लहामगे प्रा. तानाजी सावंत यांनी दिली आहे. या शिबीर कालावधीत सा. फुले पुणे विद्यापीठाचे अधिकारी, सत्यनिकेतन संस्थेचे पदाधिकारी व अनेक मान्यवर भेट देणार आहेत. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून हे शिबीर संपन्न होणार आहे. असे प्राचार्य डॉ भाऊसाहेब देशमुख यांनी सांगितले आहे.