उद्योजक सुरेश गडाख यांच्या मातोश्री यशोदाबाई गडाख यांचे निधन !

अकोले प्रतिनिधी
गडाख उद्योग समूहाचे यशस्वी उद्योजक, अगस्ति सह. साखर कारखान्याचे मा.संचालक सुरेशराव गडाख यांच्या मातोश्री यशोदाबाई संपत गडाख( वय वर्षे 83 ) यांचे वृद्धपकाळाने शुक्रवार दि.२४ डिसेंबर रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात 3 मुले,प्रकाश, कैलास व सुरेश व 1 मुलगी लता लक्ष्मण डावरे ,3 सुना, जावई,9 नातवंडे 10 पतवंडे असा मोठा परिवार आहे.कळस खुर्द येघे प्रवरतीरी मातोश्री यशोदाबाई यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मातोश्री यशोदाबाई यांनी अतिशय कष्ट करून आपल्या मुलांचा सांभाळ केला.गावतील काही भांडणे असतील तर त्या मोठ्या सचोटीने मिटवित असे.शेती मध्ये स्वतः काम करून त्यांनी आपल्या चारही मुलामुलींवर चांगले संस्कार केले.