प्रवरा पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी गुलाबराव शेवाळे ,सुरेश शिंदे यांची निवड

अकोले -अकोले तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या अकोले येथील प्रवरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी अगस्तीचे सहकारी साखर कारखान्याचे संचालक गुलाबराव पंढरीनाथ शेवाळे ,सेवानिवृत्त प्राचार्य सुरेश भाऊराव शिंदे यांची तज्ञ संचालक पदी तर मच्छिंद्र संतू भरीतकर व सोमनाथ बारकू बाळसराफ यांची स्वीकृत संचालक पदी निवड करण्यात आली
संस्थेच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत नुकतीच ही निवड करण्यात आली या निवडीनंतर त्यांचा संस्थेचे चेअरमन भास्करराव मंडलिक तसेच संचालकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक बाळासाहेब ताजने रामनाथ शिंदे, हिम्मतराव मोहिते ,भागवत त्रिभुवन व्यवस्थापक शिवाजीराव भुजबळ ,बाळासाहेब झोळेकर भाऊसाहेब जाधव ,सुरेश मंडलिक आदी उपस्थित होते
गुलाबराव शेवाळे ,सुरेश शिंदे, मच्छीन्द्र भरीतकर, सोमनाथ बाळसराफ यांचे तालुक्यात अभिनंदन करण्यात येत आहे
प्रारंभी क्रांतिजोती महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने संस्थेत महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले
