राजापूर च्या नूतन कला महाविद्यालयात प्राचार्य घोलप यांचे नॅक वर मार्गदर्शन!!

संगमनेर- प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला महाविद्यालयात दिनांक 31 जुलै 2023 रोजी साकुर येथील रमेश फिरोदिया महाविद्यालयातील प्राचार्य डॉ घोलप सर यांनी एस एस आर नंतरची नॅक प्रक्रिया या विषयी अनमोल मार्गदर्शन केले .
नॅक करणे किती महत्वाचे आहे ,याचे उपस्थित सर्व प्राध्यापकांना अगदी सुलभ भाषेत मार्गदर्शन केले.तसेच साकुर महाविद्यालयातील प्रा.कुलकर्णी IQAC समन्वयक यांनी सर्व प्रक्रिया कशी असते याची माहिती दिली याप्रसंगी प्रागतिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड.अनिल गोडसे ,उपाध्यक्ष आर पी हासे,स्कूल कमिटी चेअरमन भाऊसाहेब हासे,संचालक श्री भारत शेलकर महाविद्यालयाच्या नॅक कॉर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर संगीता जांगीड , उपप्राचार्य प्राध्यापक सुभाष वर्पे व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर स्टाफ उपस्थित होते