राहूल साबळे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड!
कोतूळ, प्रतिनिधी
: कोतूळ (शिळवंडी, ता. अकोले) येथील राहूल रामनाथ साबळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड करण्यात आली. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जांभळेवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख रामनाथ साबळे यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांच्या आई संगीता साबळे – बांबळे या पांगरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका आहेत. राहूल च्या यशाने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्राथमिक शिक्षक बॅंकेचे व्हाईस चेअरमन गंगाराम गोडे, केंद्रप्रमुख श्री. भोसले, मुख्याध्यापक डी.डी. फापाळे, केंद्रप्रमुख श्री. भवारी, दिपक बोऱ्हाडे, संदिप कोते, चंद्रकांत पवार, सचिन फुलसुंदर, राजेंद्र उकिरडे, दत्तात्रय भागवत, शांताराम वायळ, अंगद वरळे, भास्कर दिघे, रोहिदास धिंदळे, नितीन राऊत, दादाभाऊ जोशी, राहूल गोडे, मनोहर गोडे, जे.के. वैराळ, सोमनाथ मुठे, श्री. खोकले, श्री. गभाले, चांगदेव दरेकर, बाळू वायळ, श्री. वळे, वैभव लाटणे, विकास देशमुख श्री. शेख यांच्यासह अनेकांनी श्री. साबळे यांच्या घरी भेट देऊन राहूल साबळे यांचा सत्कार केला. श्री. साबळे यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
