रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 च्या असिस्टंट गव्हर्नर पदी अमोल वैद्य यांची नियुक्ती

अकोले /प्रतिनिधी
रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 च्या असिस्टंट गव्हर्नर पदी रोटरी क्लब अकोलेचे संस्थापक अध्यक्ष रो.अमोल वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुधिर लातुरे यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या रोटरी क्लबची स्थापना अकोले येथे 2017 मध्ये करण्यात आली. सामाजिक बांधिलकी असणारे विविध क्षेत्रातील
तरुण यांचा रोटरी क्लब मध्ये समावेश आहे.
रोटरी क्लबच्या स्थापनेपासून आज पावेतो सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्यात रोटरी क्लब अकोले अग्रेसर राहिला आहे. रोटरी क्लब च्या स्थापनेच्या पहिल्याच वर्षी अकोले रोटरी क्लबचा “बेस्ट न्यू क्लब “व “सायटेशन ट्रॉफी” देऊन डिस्ट्रिक्ट 3132 ने सन्मान केला आहे. रो. अमोल वैद्य यांनी यापूर्वी रोटरी डिस्ट्रिक्ट मध्ये पब्लिक इमेज चे डायरेक्टर पदाची धुरा यशस्वीपणे पार पाडली.रोटरी क्लबचे कार्य तळागाळापर्यंत पोहचविन्यासाठी रो.अमोल वैद्य हे परिश्रम घेत आहेत.याशिवाय अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष व अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत आहेत.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 मध्ये 11 जिल्ह्यांचा समावेश आहे.
त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची असिस्टंट गव्हर्नर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे संगमनेर, शिर्डी व राहुरी या तीन क्लबची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.त्यांच्या या नियुक्तीचे रोटरी क्लब अकोलेचे आजी ,माजी पदाधिकारी,सर्व सदस्य यांचेसह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.