श्री.बाळेश्वर आश्रम शाळेस आदर्श शाळा पुरस्कार जाहीर.

संगमनेर दि.12.
संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार येथील श्री बाळेश्वर अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेस कोरोना कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन २०२२-२३ चा अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. विलासराव आठरे पाटील यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘आदर्श विद्यालय पुरस्कार’, सन्मानपूर्वक शाळेस प्रदान करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमार झावरे साहेब उपाध्यक्ष रा.ह दरे सेक्रेटरी जी.डी खानदेशे सह सेक्रेटरी विश्वासराव आठरे श्री संजय आठरे यांच्या शुभहस्ते शाळेचे प्राचार्य चंद्रकांत शिरोळे व प्राथमिक मुख्याध्यापक श्री पवार एस. एम यांना प्रदान करण्यात आला.याप्रसंगी संस्था विश्वस्त डॉ. विवेक भापकर, दीपलक्ष्मी म्हसे मॅडम, सिताराम खिलारी सर,मुकेशदादा मुळे, वसंतराव कापरे, जयवंत वाघ, राहुल झावरे यांच्यासह शाळेचे शिक्षक अरुण धावणे, राजेश सांगळे,संजय पालवे, रामचंद्र गंगासागरे, शिवाजी थिटमे, जालिंदर मुळे ,गोरक्ष कानवडे, रवींद्र आगलावे, घोडे, लोंढे ,गजे, बांबळे श्रीम. नंदा साळवे, उषा लोहटे,अनिता भागवत व शालेय कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना कालावधीत प्रथम लॉकडाऊन नंतर निवासी ४०० विद्यार्थ्यांना घरी पोहोच करणे, त्यांची व पालकांची उपासमार थांबवण्यासाठी किराणा, धान्य व शैक्षणिक साहित्य नाशिक, त्रिंबकेश्वर पर्यंत पोहोच करण्याचे काम शिक्षकांनी केले. वाड्या वस्त्यावर जाऊन आदिवासी विकास विभागाचे ‘शिक्षण सेतू अभियान’ व शासनाचा ‘ब्रिज कोर्स’ याची प्रभावी अंमलबजावणी केली. शंभर टक्के पटनोंदणी करून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकून ठेवण्याचे काम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. तसेच संस्थेच्या माध्यमातून मुलींच्या निवासासाठी सुसज्य वस्तीग्रह इमारत व इतर भौतिक सुविधा निर्माण केल्याने ५३ शाखा शाळेमधून आश्रम शाळेचे निवड केली आहे.
शाळेस पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ विश्वस्त डॉ सी.के मोरे साहेब, सरपंच अहिल्याताई घुले,ग्रामस्थ व आदिवासी पालकांनी कौतुक केले आहे.