शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
माझ्या प्रपंचातील लाखो रुपये खर्च करून या तलावासाठी प्रचंड पाठपुरावा केला. परंतु तालुक्यातील काही लोकांच्या लक्षात आले की या तलावावर बंधारा होऊ शकतो व काकडे दाम्पत्यांच्या पाठपुराव्याला यश येऊ शकते. त्यानंतर मात्र नेहमीप्रमाणे विरोधकांकडून मला व या कामाला विरोध करण्यात आला. गोळेगाव पाझर तलावाचे कामकाज जाणून बुजून थांबवलं गेलं त्यामुळे आता आपणा सर्वांना एकत्र येऊन यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे संघर्षातुनच आपण विकासासाठी कटिबद्ध असे प्रतिपादन जनशक्तीचे अध्यक्ष ॲड.शिवाजीराव काकडे यांनी नागलवाडी येथे केले.
जि.प.सदस्या सौ. हर्षदा काकडे यांच्या विकास निधीतून मंजूर झालेल्या श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान भक्तनिवास पहिला मजला इमारतीचा लोकार्पण सोहळा व दुसरा मजला इमारत भूमिपूजन कार्यक्रम नागलवाडी येथे घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवस्थानचे मठाधिपती ह.भ.प.बाबागिरी महाराज होते तर कार्यक्रमासाठी जि. प. सदस्या सौ.हर्षदाताई काकडे, गोळेगावचे सरपंच विजय साळवे, जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे, शिंगोरीचे सरपंच रामराव चेमटे, अंतरवालीचे उपसरपंच जालिंदर कापसे, देवराव दारकुंडे, भाऊसाहेब सातपुते, गणेश खेडकर, पिनुभाऊ कापसे, भाऊसाहेब पोटभरे, सरपंच किरण जाधव, अक्षय भोसले, अर्जुन ढाकणे, अभिमन्यू काजळे, गंगाधर गरड, शिवाजी कणसे, बाबासाहेब गोंधळी, काँट्रॅक्टर भारत लांडे, गीते सर, राम चेमटे, नवनाथ खेडकर, भागवत रासनकर, गोरक्ष चेमटे, राजेंद्र खेडकर, आबासाहेब काकडे आदी यावेळी प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना काकडे म्हणाले की, या भागाचा विकास फक्त जलसिंचनाने होऊ शकतो. येथील धरण झाल्यास परिसरातील शेती ओलिताखाली येणार आहे. परंतु लोकप्रतिनिधींनी जाणून-बुजून हा परिसर विकासापासून वंचित ठेवला आहे व पूर्व भागाला अस्थिर करण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता तुमचा लोकप्रतिनिधी निवडताना विचार करूनच निवडा असेही ते म्हणाले.
ताईनी दिलेला शब्द पाळला…
विकास कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबागिरी महाराज म्हणाले की, देवस्थानचा विकास व्हावा ही माझी इच्छा होती. यासाठी खूप पुढाऱ्यांकडून पाठपुरावा केला परंतु ताईंनी दिलेला शब्द पाळला. या देवस्थानच्या विकासाचा पाया ताईंनी सुरू केला आहे.आता कितीही निधी मिळाला तरी त्याला महत्त्व नाही. आपल्या भागाला विकासापासून कोणी वंचित ठेवलं हे आपण ओळखले पाहिजे असेही ते म्हणाले.
महंत बाबागिरी महाराज
श्री क्षेत्र काशी केदारेश्वर संस्थान
देवस्थानचा विकास माझ्या हाताने व्हावा ही प्रभु केदारेश्वराची इच्छा होती. म्हणूनच माझी नियोजन मंडळामध्ये सदस्य म्हणून निवड झाली आणि म्हणूनच देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा क वर्गात समावेश करता आला व देवस्थानसाठी निधी निधी आणता आला.
जि.प. सदस्या सौ.हर्षदा काकडे, सदस्या लाडजळगाव जि.प.गट अहमदनगर.