“तारुण्याच्या उंबरठयावर” कामोठे पोलीस ठाणे व दिशा महिला मंचचा अनोखा उपक्रम!

दत्ता ठुबे
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने पोलीस आयुक्तालय नवी मुंबई अंतर्गत कामोठे पोलीस ठाणे व दिशा महिला मंच च्या वतीने किशोरवयीन मुलामुलींसाठी अनोखा उपक्रम राबविला.
रेझींग डे 2 जानेवारी 2023 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान साजरा करण्यात येणार असून यामध्ये “कळी उमलताना व तारुण्याच्या उंबरठयावर ‘ या ‘उपक्रमाअंतर्गत परिसरातील शाळामध्ये तज्ञ व्यक्तिकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. आज सुषमा पाटील विद्यालय, कामोठे येथील मुला – मुलींना त्यांच्यातील शारीरिक व मानसिक बदलाविषयीचे समुपदेशन विनस वूमन्स हॉस्पिटल च्या डॉ श्वेता जायभाये यांनी केले तसेच शालेय जीवनातील आपल्याला तसेच आजूबाजूला होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार कसा करावा तसेच पोलीस मित्र म्हणून कशा प्रकारे त्यांची मदत घेऊ शकतो यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ. स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. किरण राऊत यांनी मार्गदर्शन केले.

त्याचबरोबर दिशा फ्रेंड म्हणून दिशा व्यासपीठ कसे मुल-मुलींसाठी नेहमी पाठीशी असेल यावर सौ. विद्या मोहिते यांनी सांगितले. दिशा महिला मंचच्या संस्थापक अध्यक्षा सौ.निलम आंधळे तसेच सुषमा पाटील स्कूलचे शिक्षक श्री. पनवेलकर , काटकर व इतर 20 शिक्षक आणि 200 विद्यार्थी उपस्थित होते.
किशोरवयीन कालखंडाला "वादळी काळ" असे म्हटले जाते. या काळात आयुष्याची नौका भरकटायला नको या विचाराने आज या लेक्चरची आवश्यकता होती.योग्य व्यक्तींकडून मुलामुलींना मार्गदर्शन मिळत आहे याबाबत शाळेतून आनंद व्यक्त केला जातो. मुलांसाठी हा दिशादर्शक उपक्रम असल्याचे यावेळी दिशा महिला मंचच्या संस्थापक अध्यक्षा सौ.निलम आंधळे यांनी सांगितले.