ओरिसा ,राजस्थान, पंजाब या सरकार प्रमाणेच वीज कंत्राटी कामगारांना सामावून घेऊन कायम करण्याची मागणी

पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या( संलग्न भारतीय मजदूर संघ) सर्व सदस्य आणि राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगार उतरणार आंदोलनात
वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समिती मधील सदस्य मा.संजयजी ठाकूर साहेब यांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष यांना फोन करून सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या शिष्टमंडळा सोबत प्रकाशगड मुंबई येथे यावे आपण चर्चा करू असे निमंत्रण दिले होते.
त्यानुसार त्यांच्या विनंतीला मान देऊन 2 तारखेला ठीक 3 वाजता महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने अध्यक्ष निलेश खरात सरचिटणीस सचिन मेंगाळे, कोषाध्यक्ष सागर पवार, उपमहामंत्री राहुल बोडके, पुणे झोन अध्यक्ष सुमित कांबळे, आणि प्रकाशगड हेड ऑफिस येथील आपले पदाधिकारी श्रीकांत मगरे इत्यादी पदाधिकारी आणि सोबत कायम कामगारांची संघटना वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष मा. विठ्ठलजी भालेराव, सरचिटणीस मा.अरुण पिवळ, मा.वसंत काळे कार्याध्यक्ष महानिर्मिती, मा. प्रशांत भांबुर्डेकर उपमहामंत्री, मा.शर्मिलाताई पाटील, मा.दत्ता न्हावकर, अनंत जाधव सचिव महानिर्मिती, मा.विठ्ठल बागल उपमहामंत्री महानिर्मिती, कृती समिती पदाधिकारी उपस्थित सुध्या प्रकाशगड मुंबई येथे हजर होते
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने (संलग्न भारतीय मजदूर संघ) एक मागणी राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांच्या साठी केली आहे व ही मागणी संघर्ष समितीने मान्य केली आहे तसे पत्र शासनास दिले आहे
महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील नियमित रिक्त पदांच्या जागेवर व कामाच्या गरजेनुसार काम करत असलेल्या वीज कंत्राटी कामगारांना नियमित भरती करताना ओरिसा राजस्थान पंजाब या सरकार प्रमाणेच प्राधान्याने सामावून घेऊन कायम करण्यात यावे घ्यावे अथवा पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असताना ज्या रोजंदारी कामगार पद्धतीने कामगारांना कंत्राटदार विरहित व शाश्वत रोजगार दिला गेला त्या प्रमाणेच रानडे समितीचे अहवाला नुसार महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील नियमित रिक्त पदांच्या जागेवर व कामाच्या गरजेनुसार आज रोजी तिन्ही कंपनीत काम करत असलेल्या सर्व वीज कंत्राटी कामगारांना वयाच्या 60 वर्षा पर्यंत शाश्वत रोजगार देण्यात यावा .
ही मागणी शासनास देण्याचे संघर्ष समितीने मान्य केल्यामुळे आपण राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांनी संघर्ष समिती ने पुकारलेल्या आंदोलनात एकत्र येऊन सोबत उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मितील कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांनी या संपामध्ये सहभागी व्हावे व हा संप यशस्वी करावा ही विनंती असे आवहान महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व महामंत्री सचिन मेंगाळे यांनी केले आहे.