आजचे पंचांग व राशिभविष्य दि.१९/१०/२०२४

:
🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन २७ शके १९४६
दिनांक :- १९/१०/२०२४,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०३,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- व्दितीया समाप्ति ०९:४९,
नक्षत्र :- भरणी समाप्ति १०:४७,
योग :- सिद्धि समाप्ति १०:४१,
करण :- वणिज समाप्ति २०:१४,
चंद्र राशि :- मेष,(१६:१०नं. वृषभ),
रविराशि – नक्षत्र :- तुला – चित्रा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- वृश्चिक,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- स. ११प. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०९:२० ते १०:४७ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:५२ ते ०९:२० पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०१:४१ ते ०३:०८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:०८ ते ०४:३५ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
भद्रा २०:१४ नं., तृतीया श्राद्ध,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आश्विन २७ शके १९४६
दिनांक = १९/१०/२०२४
वार = मंदवासरे(शनिवार)
मेष
जोडीदाराचे सहकार्य लाभेल. वैवाहिक सौख्यात वाढ होईल. दिवस उत्तम रित्या व्यतीत कराल. व्यावसायिक क्षेत्रात ठाम रहा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
वृषभ
अधिकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल. अती विचार करू नका. प्रिय व्यक्तीकडून भेट मिळेल. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. आरोग्याची काळजी घ्यावी.
मिथुन
कामाच्या शैलीत बदल करावा लागेल. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केन्द्रित करावे. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. स्वभावात करारीपणा बाळगावा. बोलताना तारतम्य बाळगावे.
कर्क
राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना फलदायी दिवस. घरासाठी आवर्जून काही गोष्टी कराल. खर्चाचा आकडा वाढता राहील. अधिकारी वर्गाला नाराज करू नका. दिवस धावपळीत जाईल.
सिंह
विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. लोकांचा विश्वास संपादन कराल. संपूर्ण विचार केल्याशिवाय वचन देऊ नका. कलेतून चांगला लाभ होईल. नवीन प्रकल्प हाती घ्याल.
कन्या
कौटुंबिक वातावरणात अधिक रमाल. समस्यांचे निराकरण होईल. लोकांकडून चांगल्या कामाची प्रशंसा होईल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. रचनात्मक कामे करता येतील.
तूळ
आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा लागेल. भविष्यातील योजनांवर काम चालू करा. मैत्रीचे नवीन प्रस्ताव येतील.
वृश्चिक
दिवस धावपळीत जाईल. परंतु केलेल्या कामातून समाधान मिळेल. संमिश्र घटनांचा दिवस. क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल.
धनू
कार्यालयीन ठिकाणी उत्तम सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रिय व्यक्तीकडून भेट मिळेल. जुन्या गैरसमजुती दूर होतील. झोपेची तक्रार जाणवेल.
मकर
दिवसाची सुरवात उत्साहात कराल. प्रलंबित कामे मार्गी लावाल. कामा व्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नये. भावंडांशी मतभेद संभवतात. मानसिक शांतता जपावी.
कुंभ
विरोधकांकडे दुर्लक्ष कराल. जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्यात. अती तिखट पदार्थ खाऊ नयेत. उत्तम वाहन सौख्य लाभेल. आपल्यातील आक्रमकतेला आवर घालावा.
मीन
मनातील गैरसमज दूर करावेत. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न यश देतील. आपल्याच मतावर अडून राहू नका. मानसिक समतोल साधावा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर