इतर

नेप्ती शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात !

अहमदनगर- समेलनातून विद्यार्थ्याच्या कलागुणांनानाही वाव मिळतो. यामुळे विद्यार्थ्याच्या अध्ययन क्षमताचे सक्षमीकरण होण्यास मदत होते. नेप्ती प्राथमिक शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. प्राथमिक शाळामधून जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक होण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरु आहे. मिशन आपुलकी अभियानाअंतर्गत शाळेला पालकांनी भरीव मदत करण्याचे आव्हान त्यांनी केले केले. ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सुसवांदातून शाळेमध्ये राबवित असलेल्या विविध शालेय उपक्रमाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी कौतुक केले . नेप्ती ( ता. नगर ) येथील जिल्हा परिषद प्रा.शाळेत वार्षिक स्मेहसंमेलन व बक्षिस वितरण कार्यक्रम कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपशिक्षणाधिकारी जयश्री कार्ले, सरपंच सविता जपकर,उपसरपंच संजय जपकर, उद्योजक संजय अशोक जपकर माजी उपसरपंच शिवाजी होळकर,जालीदर शिंदे, रामदास फुले, वंसत पवार , दत्तात्रय कदम, निर्मला कांडेकर,ललिता पुंड, संतोष चौरे, एकनाथ जपकर, साई सजीवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुनाथ होळकर, बंडू जपकर ,सौरभ जपकर, भानुदास फुले ,शाहूराजे होले, राहुल गवारे, महिंद्र चौगुले ,पाराजी चौरे व परिसरातील पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कार्ले यांनी केले. या स्नेहसंमेलनात बालगीते लोकगीते लावण्या मावळ्यांचे नृत्य देशभक्तीपर गीते महाराष्ट्राची लोकधारा शेतकरी गीते आशा विविध गाण्यांनी रसिकांना खेळून ठेवले .

ध्वनी संयोजनाची धुरा तुषार भुजबळ तर व्हिडिओ शूटिंगची धुरा अनिल पवार यांनी सांभाळली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक बेल्हेकर, उपाध्यक्ष राणी गव्हाणे, सर्व सदस्य शिक्षकवृंद, सावता बनकर, नूतन पाटोळे ,योगेश पवार, दीपक साळवे, राजश्री कोल्हे, मंदा इंगोले ,रखमाबाई जपकर ,तसेच अंगणवाडी सेविका ग्रामसेवक, ग्रामस्थ, पालक यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास तालुक्यातील शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब नगरे सर तरआभार मीना नायगावकर यांनी केले. मा.संपादक साहेब वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button