.
सोलापूर – सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनच्या वतीने यापूर्वी पद्मशाली समाजाचे कुलदैवत चिरंजीव महर्षी मार्कंडेय महामुनी जन्मोत्सव आणि रथोत्सवानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आले होते. पहिल्या टप्प्यातील विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण उत्साहात करण्यात आले आहे.
प्रारंभी महर्षी मार्कंडेय महामुनींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त रामचंद्र जन्नू, उपाध्यक्ष अंबादास बिंगी, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे सचिव गणेश पेनगोंडा, सहाय्यक सरकारी वकील शैलजा क्यातम, प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी सभापती वासुदेव इप्पलपल्ली, अरिहंत इंग्लिश मेडियम स्कूलचे संस्थापक अजय पोन्नम, सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश कोंडी, फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, सल्लागार, सुकुमार सिध्दम यांची व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
याप्रसंगी जन्नू, बिंगी, क्यातम, इप्पलपल्ली, पोन्नम यांच्यासह आदींनी मनोगत व्यक्त केले. ‘लोणचे स्पर्धेतील’ प्रथम विजेते शीतल सोमाणी, द्वितीय मधुरा शिवयोगी, तृतीय प्रेमा सोमाणी, उत्तेजनार्थ कोमल अवताडे, विभागून उमा चिलवेरी, विजयालक्ष्मी कुरापाटी, ‘माझा प्रभाग.. माझा नगरसेवक आभासी निबंध स्पर्धेचे’ प्रथम विजेते शैलेंद्र पाटील, द्वितीय मल्लीनाथ बिराजदार, तृतीय सुरेखा क्षीरसागर, ऑनलाईन शिक्षणाचे फायदे किंवा तोटे निबंध स्पर्धेचे प्रथम विजेते आरती बुधारम, द्वितीय अरिता आवार, तृतीय तेजश्री सामल, उत्तेजनार्थ स्वराली द्यावरशेट्टी, आणि ‘महाराष्ट्रीयन साजश्रृंगार आणि उखाणे स्पर्धेचे’ प्रथम विजेते स्नेहल काकडे यांना पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे. ‘लोणचे स्पर्धेसाठी’ अरिहंत इंग्लिश मेडियम स्कूल (अजय पोन्नम) तर्फे प्रथम रु. ३०००/-, फ्रोजन मॉल श्रीनिवास बोनाकृती तर्फे द्वितीय रु. २०००/-, अजय म्याना उपव्यवस्थापक महावितरण (नगर शहर) तृतीय रु. १०००/-, उत्तेजनार्थासाठी रघुरामुलू कंदीकटला तर्फे रु. १०००/- तसेच सहभागी झालेल्या स्पर्धकांना आकर्षक भेट गणेश पेनगोंडा यांच्या कडून देण्यात आले. माझा प्रभाग..माझा नगरसेवक आभासी निबंध स्पर्धेसाठी श्रीधर वडनाल यांनी प्रथमसाठी १५००/-, द्वितीयसाठी लक्ष्मण दोंतूल यांनी १०००/-, सुधाकर नराल यांनी ७५१/-, ‘महाराष्ट्रीयन साजश्रृंगार आणि उखाणे स्पर्धेसाठी’ आकर्षक साड्या शैलजा क्यातम यांनी दिले. तर, ‘ऑनलाईन शिक्षणाचे फायदे किंवा तोटे निबंध स्पर्धेसाठी’ वासुदेव इप्पलपल्ली यांच्या कडून देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती बुधारम यांनी केल्या. श्री मार्कंडेय जनजागृती संघाचे कार्याध्यक्ष किशोर व्यंकटगिरी यांनी आभार मानले. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.