नगराध्यक्ष विजय औटी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा !

वाढदिवसाचे औचित्य साधत पारनेर शहरात सात कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ !
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर नगरपंचायतीचे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर शहरवासियांना काहीतरी दिले पाहिजे या हेतूने सात कोटी रूपयांच्या विविध विकास कामांची भेट आ.लंके यांचे कडून पारनेर शहरासाठी देण्यात आली असून , या कामांचा प्रत्यक्ष शुभारंभही करण्यात आल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.
नगराध्यक्ष विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात आ.लंके हे बोलत होते. आ. लंके म्हणाले, विजय औटी हा एक संघर्षशिल व तरूणांचे संघटन करणारा आमचा युवक सहकारी आहे. स्वतःचा कधीही विचार न करता नेहमी सर्वसामान्य कुटूंबाला आपण काहीतरी मदत केली पाहिजे या भावनेतून त्यांचे काम सुरू असते. चांगले काम करताना अनेक संकटे आली, अडचणी आल्या मात्र संकटाला, अडचणींना न घाबरता वाटचाल करीत विजय औटी यांचे चांगल्या पध्दतीने काम सुरू आहे. तरूण, अंध, अपंग यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावणाऱ्याविजयचा मला सार्थ अभिमान असल्याचे लंके म्हणाले.
नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमताचा आकडा जुळविल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली त्यावेळी सर्वांनी एकमताने विजय औटी यांच्यावर जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला. विजय औटींवर जबाबदारी सोपवून शहरास वेगळया उंचीवर घेऊन जाण्याचे काम सोपविण्यात आले आहे. सर्व नगरसेवक, पारनेरकरांनी विश्वास टाकला असून त्या विश्वासास तडा न जाऊ देता पारनेरमध्ये नेहमी काहीतरी विधायक घडले पाहिजे यासाठी त्यांची नेहमी धडपड सुरू असते. वाढदिवसाचे औचित्य साधून विजय औटी यांनी पारनेर शहराचा तीन हजार वर्षांचा इतिहास जगापुढे मांडण्याची संकल्पना मांडली असून पारनेरचे नाव, राज्यात,देशात व जगात पोहचविण्यासाठी त्यांनी विडा उचलला आहे असे लंके यांनी सांगितले.
नगराध्यक्ष विजय औटी म्हणाले, पारनेर शहराचा विकास सुरूच आहे. आजच सात कोटींच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. विकास कामांबरोबरच आपल्या शहराचे नाव साता समुद्रापार गेले पाहिजे यासाठी आम्ही शहराचा तीन हजार वर्षांचा इतिहास जगापुढे मांडणार आहोत. पारनेर शहराला मोठा धार्मीक, पौराणिक वारसा आहे. प्रतिकाशी म्हणून पारनेर शहराची ओळख आहे. शहरात बारा ज्योतिर्लिंगे असून त्याचा विकास करून त्यांना प्रकाश झोतात आणण्याची आमची धडपड आहे. पारनेर शहरात जशी मनकर्णिका नदी आहे तशी मनकर्णिका नदी काशी येथे आहे. प्रतिकाशीचे महत्व देशात राज्यात गेल्यास पारनेर शहर एक धार्मिक स्थळ म्हणून नावारूपास येईल. त्यातून शहराच्या विकासाबरोबरच आर्थिक उलाढाल वाढण्यासही मदत होईल असा विश्वास औटी यांनी व्यक्त केला.
पारनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून सात कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ समारंभास तसेच
नगराध्यक्ष विजयराव औटी यांच्या वाढदिवसा साठी पारनेर नगरपंचायतचे सर्व नगरसेवक पारनेर शहरातील शहरवासीय तालुक्यातील विविध पक्षातील मान्यवर नेते मंडळी , हितचिंतकांनी प्रत्यक्ष भेटून नगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या व भव्य शुभारंभासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पाणी योजनेचे लवकरच भूमीपुजन !
विजय औटी यांच्या वाढदिवसालाच पारनेर शहराच्या पाणी योजनेचे भूमिपुजन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतू राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर योजनेच्या मंजुरीस विलंब झाला. या योजनेस लवकरच मंजुरी मिळवून भूमिपुजन करण्यात येईल अशी ग्वाही आ. लंके यांनी दिली.
प्रतिकाशीच्या पोष्टरचे विमोचन !
नगराध्यक्ष विजय औटी यांच्या संकल्पनेतील प्रतिकाशीच्या पोष्टरचे आ.नीलेश लंके यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात येवून प्रतिकाशीच्या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला
रक्तदुत दत्ता येवले यांच्या मार्गदर्शना खाली २७० रक्त पिशव्यांचे संकलन !
पारनेर तालुक्याचे सुपुत्र असणारे व कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत रक्तपुरवठा करणारे रक्तदूत , दत्ता येवले यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष औटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद लाभला. तालुक्यातील तरूणाईने रक्तदान करण्यासाठी गर्दी केली होती. दिवसभरात २७० रक्त पिशव्यांचे संकलन झाल्याचे मा.नगरसेवक नंदकुमार औटी यांनी सांगितले.
शंभर रूग्णांची नेत्र तपासणी !
वाढदिवसानिमित्त मोफत मोतीबिंदू निदान व नेत्रतपासणी शिबिरामध्ये १०० रूग्णांची तपासणी करण्यात येऊन मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले. त्यापैकी पाच रूग्णांना बुधवारी शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.
ह भ प इंदुरीकर यांच्या कीर्तनास अलोट गर्दी !
वाढदिवसानिमित्त नामांकित गायकांच्या गीतांचा कार्यक्रम, इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते. सायंकाळपासूनच उपस्थितांसाठी मिष्ठान्न भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
सात कोटीेंची विकास कामे !
प्रभाग ८ मध्ये ४८ लाख रूपये खर्चाचा सिकंदर शेख घर ते मनकर्णिका नदीपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण, ६ लाख २५ हजार रूपये खर्चाचे सेनापती बापट मार्ग ते शांताराम कावरे घर रस्ता काँक्रीटीकरण व ड्रेनेज लाईन, ३ लाख रूपये खर्चाचे जयकांत कदम घर ते जगन्नाथ ढवळे घर रस्ता पेव्हिंग ब्लॉक बसविणे, ३ लाख १८ हजार रूपये खर्चाचे किसन साठे ते सेनापती बापट मार्ग रस्ता पेव्हिंग ब्लॉक बसविणे
प्रभाग ६ मध्ये १२ लाख रूपये खर्चाचा पुणेवाडी फाटा ते चेडेवस्ती रस्ता काँक्रीटीकरण, २० लाख रूपये खर्चाचे पेट्रोल पंप ते औटी वस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण
प्रभाग क्र. ९ मध्ये ११ लाख ७६ हजार रूपये खर्चाचे सुभाष नगरे घर ते शरद घंगाळे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व ड्रेनेज लाईन.
प्रभाग क्र. २ मध्ये २९ लाख रूपये खर्चाचे भिकाजी बुगे घर ते अंगणवाडी रस्ता काँक्रीटीकरण.
प्रभाग क्र. ३ मध्ये २६ लाख ५० हजार रूपये खर्चाचे भाऊ शेटे घर ते बाळू शेटे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण, ४९ लाख ४० हजार रूपये खर्चाचे कचरा डेपो अंतर्गत रस्ते. ६५ लाख ६६ हजार रूपये खर्चाचे कचरा डेपोअंतर्गत अतिरिक्त शेड उभारणे
प्रभाग क्र. १६ मध्ये ६९ लाख रूपये खर्चाचे सुपा रोड ते वरखेड मळा रस्ता डांबरीकरण.