इतर

आ.निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली फेब्रुवारी मध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन !

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी २ ते ५ फेब्रुवारीदरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहीती.आमदार निलेश लंके जनसंपर्क कार्यालयात युवा नेते दिपक लंके यांनी पत्रकार परीषदेत दिली.
गुरूवार दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी या प्रदर्शनाचे उदघाटन राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तर राज्याच्या आदर्शगांव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्श्री डॉ. पोपटराव पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आ. नीलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
‘विचार छत्रपतींचा सन्मान बळीराजांचा’ ही टॅगलाईन घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात कृषी तंत्रज्ञान, खते, कुक्कुटपालन, बँक अर्थ सहकार्य, सोलर,सिंचन, हरितगृह, शेती मार्गदर्शन, शेती औजारे, बी-बीयाणे, शासकीय योजना, महिला उद्योगविषयक माहिती, नवनवीन ट्रॅक्टर, डेअरी तंत्रज्ञान, महिला बचत गट, शेती विषयक सर्व माहिती, आरोग्य विषयी जनजागृती, मुला मुलींसाठी शाळा कॉलेज तसेच कॉम्प्युटर विषयी माहितीचा समावेश करण्यात येणार आहे.
पारनेर मधील कृषी उत्पन्न बाजार समितीलगतच्या प्रांगणात सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान पार पडणाऱ्या या प्रदर्शनात पशु पक्षी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात येणार असून त्याचे गाय, बैल, अश्‍व, बोलका पोपट, श्‍वान हे आकर्षण असणार आहे. खाऊ गल्ल्लीमध्ये कोकण, मराठवाडा, कोल्हापूर, सांगली येथील प्रसिध्द असलेल्या विविध खाद्य पदार्थांची मेजवाणी या प्रदर्शनाच्या निमित्ताने मिळणार असून महिलांसाठी नव-नवीन गृहउपयोगी वस्तूंचे स्टॉलही खास आकर्षण असणार आहे. लहान मुलांसाठी स्वतंत्र किडस् झोनची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे कारभारी पोटघन यांनी सांगितले. या प्रदर्शनात सहभागी होऊ इच्छिणा ऱ्या स्टॉलधारकांनी ७५५८३९४०४३, ७६६६८०५२६९, ९६३७९४३३३३, ८६९८७३३६६८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार परीषदेस राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, सुदाम पवार, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर,डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे,बाळासाहेब नगरे, भाऊसाहेब भोगाडे, बा. ठ.झावरे, भागुजी झावरे, रा. या. औटी, किसानराव रासकर, खंडू भुकन, राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष सदाशिव शेळके, तालुका उपाध्यक्ष कांतीलाल शेळके, नगरसेवक डॉ. सचिन औटी, विजय औटी, सुभाष शिंदे, योगेश मते, भुषण शेलार, श्रीकांत चौरे, विजय डोळ, अमित जाधव,अक्षय चेडे, सलीम राजे, वैभव गायकवाड, रमीज राजे, संदीप पवार, सचिन साठे, जगदीश गागरे, संपत वाळुंज, बन्सी जाधव, सुदाम जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button