
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
गावाविषयी असणारे प्रेम व आपल्या गावाला आपलं कुटुंब मानणारे जगन्नाथ दादा गावडे हे माळेगावला नव्हे तर तालुक्याला लाभलेला कोहिनूर हिरा आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचे समाजासाठी काम आहे. संपूर्ण गावाला एकजुटीने घेऊन चालत त्यांनी प्रेम दिले. तालुक्याने त्यांचा गौरव करावा यासाठी ते पात्र आहेत. या गावचा आदर्श तालुक्याने घ्यावा असे प्रतिपादन जनशक्तीचे संस्थापक अॅड.शिवाजीराव काकडे यांनी माळेगाव ने येथे केले.
जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांच्या विकास निधीतून १५ वा वित्त आयोग (अनटाईड – २५१५ २४७७) अंतर्गत मौजे माळेगाव ने येथे गावअंतर्गत रस्ता करणे विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसुदेव भिसे हे होते तर कार्यक्रमासाठी जि.प. सदस्या सौ.हर्षदा काकडे, जनशक्तीचे महासचिव जगन्नाथ गावडे, सुरेश नाना चौधरी, सरपंच सौ.अर्चना गावडे उपसरपंच सौ.मंदाबाई गावडे, किसनराव झुंबड. राजेंद्र दोरके, सुभाष आंधळे, दत्तात्रय गाडे, देवराव दारकुंडे, भाऊसाहेब सातपुते, शंकर काटे, भाऊसाहेब कर्डिले, गहिनीनाथ शिंदे, मनोहर झिरपे, प्रा.सखाराम घावटे, पंढरीनाथ सुडके मा.सरपंच लक्ष्मण भालेराव आदी यावेळी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना अॅड.काकडे म्हणाले की, ताजनापुर लिफ्ट योजनेमध्ये या भागातील २० गावे समाविष्ट करण्यामध्ये माळेगावचा मोठा वाटा आहे. येथील प्रत्येक घरातील सदस्य या चळवळीमध्ये जनशक्ती सोबत ठामपणे उभा राहिला. या एकमेव गावामुळे २० गावे योजनेमध्ये समाविष्ठ झाली. याबद्दल या २० गावातील नागरिकांनी माळेगावकरांचा गौरव करायला हवा असे ते बोलताना म्हणाले.
सौ.काकडे म्हणाल्या की, या रस्त्यासाठी गावडे दादांची व गावकऱ्यांची मागणी होती त्यानुसार रस्त्यासाठी निधी आणता आला याचा आनंद वाटतो. रस्ता चांगला व्हावा याकरिता गावातील व्यक्तीला काम मिळाले आहे. त्यामुळे काम चांगले करून घ्यावे.