वीज कंत्राटी कामगारांचा नागपूर येथे मोर्चा व आमरण उपोषण

, सरकार कडून कोणतेही चर्चा नाही, आंदोलन त्रिव करणार
भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्र काटी कामगार संघाच्या वतीने वेतनवाढ व हरियाना सरकार प्रमाणे वीज उद्योग त कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार मिळावा या व अन्य प्रमुख मागण्यासाठी आज शनिवार दि.24 ऑगस्ट रोजी राज्यभरातून सुमारे 4000 वीज कंत्राटी कामगार एकत्र येऊन रेशीमबाग मैदान पासून ते ऊर्जामंत्री मा ना देवेंद्रजी फडणवीस यांच्या निवासस्थाना पर्यंत पायी मोर्चा काढला, हा मोर्चा संविधान चौक येथे अडवण्यात आला. दि 27 ऑगस्ट रोजी उपोषण चा 4 था दिवस असुन पण अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही , त्यामुळे आंदोलन त्रिव करणार असल्याचे महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले आहे.
26 कामगार प्रतिनिधी यांनी संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात व सचिन मेंगाळे यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जामंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी मा. सुनील मित्रा यांना निवेदन दिले होते. व लवकरच चर्चा करण्यात येईल असे आस्वासन दिले होते.
राज्याचे ऊर्जामंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संघटने सोबत सकारात्मक चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढावा व जो पर्यंत ऊर्जामंत्री भेटून ठोस तोडगा काढत नाही तो पर्यंत कामगार घरी जाणार नाही या कामगारांनी संविधान चौकात बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.संविधान चौक नागपूर येथे आमरण उपोषणासाठी बसलेले महाराष्ट्रातील वीज कंत्राटी कामगार हे आहेत .
1)मारुती गुंड (धाराशिव )
2)राजू काळे (सोलापूर )
3)अंगत नाईकनवरे (जालना)
4)अंकुश डोगंरवार (वर्धा )
5)दिलीप भगत (चंद्रपुर)
6)राहुल भालबर (कोल्हापूर )
7 )संदीप मोकळकर (अकोला)
8) जितेंद्र काळे (चंद्रपुर)