इतर

शेणित येथील राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालयात टिळक व साठे जयंती साजरी

अकोले प्रतिनिधी

राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय ठोकळवाडी शेणीत व जि.प. प्राथमिक शाळा ठोकळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री एम. एम. लांघी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर यांनी उपस्थितांचे स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
शालेय विद्यार्थ्यांची वकृत्व स्पर्धेनिमित भाषणे झाली.
यावेळी श्री घनशाम नवले सरांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते म्हणाले, ” देश पारतंत्र्यात होता तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून जहाल मतवादी गटाचे लोकमान्य टिळक यांनी स्वराज्याची चळवळ उभी केली. त्यासाठी गणेशोत्सव व शिवजयंती हे कार्यक्रम लोकांना एकत्र आणण्यासाठी सुरु केले.
त्यांचा उद्देश एकच होता की जनजागृती करणे, देशाबद्दल प्रेम निर्माण करणे, भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत निर्माण करणे. ते अन्यायाविरोधी लढले. समाजसेवे बरोबर शाळा कॉलेज सुरु केले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाज प्रबोधन केले, पोवाडे, लोकगीते, अनेक कादंब-यांतून समाजाचे चित्रण केले.”
शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर सर म्हणाले, ” संस्थेचे अध्यक्ष श्री एम.एम. लांघी साहेब यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत हे विद्यालय सुरु केले. अनेक सामाजिक, धार्मिक कामे करताना समस्यांना तोंड द्यावे लागले. विद्यालयासाठी, गावासाठी, शिक्षणासाठी महान कार्य केले. त्यांच्याच प्रयत्नातून विद्यार्थांना मोफत शालेय साहित्य मिळाले व गणवेश मिळणार आहेत. त्यांनी अनेक संघटनांचे अध्यक्षपद भुषवले आहे.”


यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री एम. एम. लांघी , कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विठठल गोगा धोंगडे, संस्थेचे खजिनदार श्री मुरलीधर तळपे बाबा, माजी गट शिक्षणाधिकारी सौ. सुलभा लांघी मॅडम, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री किसनराव लांघी, जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री गभाले सर श्री संतु जाधव सर, श्री विजय बढे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री नारायण धोंगडे, श्री अशोक लांघी, श्री पोपट भांगरे, ग्रामस्त व विदयार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर सर यांनी केले तर श्री तुकाराम बेणके सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button