अकोलेचे डॉ. विष्णू गणपती आंबी महा अॅक्युपंक्चर रत्न पुरस्काराने सन्मानित

अकोले प्रतिनिधी-
अकोले येथील जेष्ठ अॅक्युपंक्चरीस्ट प्राध्यापक डॉ. विष्णू गणपती आंबी यांना आयुष इंटरनेशनल मेडीकल असोसिएशन यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा “महा अॅक्युपंक्चर रत्न पुरस्कार २०२६” देऊन गौरविण्यात आले. अॅक्युपंक्चर उपचार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, अध्ययन, प्रचार, प्रसार, रुग्णसेवा तसेच सामाजिक व समाजउपयोगी योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
रविवार दि.१९ जुलै २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण नाटयगृह, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळयात मान्यवरांचे हस्ते डॉ. विष्णू आंबी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी
यावेळी
डॉ. बाबुराव कानडे (राष्ट्रीय अध्यक्ष आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन) डॉ. नितीनराजे पाटील( व्हा.चेअरमन,आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन)
अध्यक्ष डॉ. सतिश कराळे,कार्यकारिणी सदस्य डॉ. अभिजीत कवठकर,प्रशांत सावंत,सो. दिशा चव्हाण,श्री. विजय नवल पाटील,श्री. तुषार वाटधूळे , जेष्ठ बंधू डॉ. भानुदास आंबी, भवानीनगर जि. सांगली हे आवर्जुन उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल त्यांचे मातोश्री गंगुबाई शिंदे अॅक्युपंक्चर मेडिकल कॉलेजचे डॉ. अनिल रहाणे, अध्यापक वर्ग आणि विद्यार्थी तसेच अकोले तालुका मेडिकल असोशिएशनने त्यांचे अभिनंदन केले आहे.
डॉ. विष्णू आंबी यांची सेवा आनंदी अॅक्युपंक्चर क्लिनीक कचेरी परिसर, अकोले, अध्यापक, मातोश्री गंगुबाई शिंदे,अॅक्युपंक्चर महाविदयालय आनंदगड, विरगाव अकोले येथे चालू असून त्यांना महाराष्ट्र कोन्सिल ऑफ अॅक्युपंक्चरद्वारे अध्यापक म्हणून मान्यता मिळालेली आहे.
डॉ. विष्णू गणपती आंबी हे १९८० पासून अॅक्युपंक्चर उपचार पध्दतीद्वारे असंख्य रूग्णांना आरोग्यदायी जीवन देण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील चिपळूण, पुणे, इगतपुरी, संगमनेर, अकोले आदी परिसरातील रूग्णांना अॅक्युपंक्चर उपचार पध्दतीद्वारे सेवा दिली आहे.
अॅक्युपंक्चर क्षेत्रात त्यांनी केलेल्या संशोधनात्मक दृष्टीकोन, आधुनिक तंत्र ज्ञानाचा वापर, रूग्णांप्रति असलेली समपीत सेवा आणि समाजातील आरोग्य जागृतीसाठी घेतलेले उपक्रम, अध्यापन, लेखन यामुळेच त्यांची ही निवड करण्यात आली.
डॉ. आंबी यांना मिळालेला हा सन्मान हा अकोले तालुका परिसर, मातोश्री गंगुचाई शिंदे अॅक्युपंक्चर महाविदयालय, आनंदगड वीरगांव, अकोलेतील शेकडो विदयार्थी यांच्यासाठी अभिमानाचा आहे



