संगमनेर व अकोले पोल्ट्री असोसिएशनची बैठक संपन्न!

अकोले प्रतिनिधी
संगमनेर व अकोले पोल्ट्री असोसिएशनची बैठक रविवारी ईश्वर कातोरे यांचे फार्म वर आंबीखालसा ता संगमनेर येथे पार पडली
पोल्ट्री विषयासंदर्भातील अनेक विषयांवर यात चर्चा झाली ऊर्जा कंपनी फार्मरचं शोषण करीत आहे लॉट फेल गेल्यावर पेमेंट देत नाही या विषयावर एकमताने ठराव करण्यात आला त्या कंपनीचे पक्षी कोणीच घ्यायचे नाही व त्या कंपनीला पोल्ट्री असोसिएशन मार्फत समज देऊन कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात आला पोल्ट्री
असोसिएशनची सभासद नोंदणी फी 1100 रूपये सर्व पोल्टी धारकांनी सचिव कैलास वाघमारे
मोबाईल नंबर 9822747098 वर संपर्क साधून सभासद फी भरावी असे अकोले संगमनेर तालुका पोल्ट्री असोसिएशन चे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी सांगितले
यावेळी संगमनेर अकोले पोल्ट्री असोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित होते