अकोले तालुक्याच्या ४० वर्षाच्या राजकारणातील संघर्ष योद्धाला अखेरचा निरोप!

अशोकराव भांगरे यांच्या निधनाने
अकोले तालुक्याची मोठी हानी
— विरोधी पक्षनेते अजित दादा पवार
अशोकराव भांगरे यांच्या निधनाने तालुका हळहळला
अकोले प्रतिनिधी
आदिवासी, कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या बाजूने सतत 40 वर्ष राजकारणात लढणाऱ्या अकोले तालुक्याच्या संघर्ष योद्धा ला आज अकोले करांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला
अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोकराव यशवंतराव भांगरे यांचे गुरुवारी (दि 12) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले
आज गुरुवारी रात्री 7.30 वाजता त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला यावेळी त्यांना तातडीने घोटी येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला
त्यांच्या निधनाची वार्ता तालुक्यात समजतात सर्वत्र दुःखाची छाया पसरली त्यांच्या अचानक जाण्याने अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे
माजी मंत्री मधुकर पिचड यांचे पारंपरिक विरोधक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते सलग पाच विधानसभा निवडणुका त्यांनी मधुकर पिचड यांच्या विरोधात लढल्या त्यात त्यांना प्रत्येक वेळी पराभवाला सामोरे जावे लागले असे असताना देखील त्यांनी कधीही हार न मानता त्यांनी खंबीरपणाने पिचड विरोधक म्हणून राजकारणात भूमिका साकारली पंचायत समिती सदस्य सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे सभापती अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले
अनेक निवडणुकांत पराभव स्वीकारून ही तेवढेच अढळ राहिलेले शांत आणि संयमी असणारे अशोकराव भांगरे सतत जनतेसोबत राहिले हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले यामुळेच ते एक लोकाभिमुख नेते ठरले लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एक लोकनेता गमावला अशा भावना तालुक्यात व्यक्त केल्या जात आहे

राज्यातील सत्तांतर आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या भाजप प्रवेशानंतर सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली भांगरे कुटुंबाला संधी मिळत असताना त्यांनी मनाचा मोठेपणा घेत डॉ किरण लहामटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून संधी दिली शरद पवार आणि अजित दादा यांचे नेतृत्वाखाली लहामटे यांना उमेदवारी देऊ करत त्यानी पिचड घराण्याचा आमदारकीला पराभव केला त्यानंतर तालुक्यात खऱ्या अर्थाने राजकीय परिवर्तन दिसून आले या परिवर्तनाचे ते खरे शिल्पकार ठरले

विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्री शरद पवार यांना ताकद देण्यासाठी त्यांनी अकोले तालुक्यात राष्ट्रवादीची मजबूत बांधणी सुरू केली आमदार लहामटे यांच्या रूपाने त्यांनी अकोले तालुक्याला एक तरुण कणखर आमदार दिला त्यानंतर तालुक्यात राष्ट्रवादीची घौड दौड सुरू झाली . राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून अकोले तालुक्यात सहकारात देखील परिवर्तन घडवून आणले 38 वर्षाची अगस्ती साखर कारखान्यातील पिचड यांची सत्ता उलथून टाकण्यास मोलाची कामगिरी केली अगस्ती कारखान्यात देखील पिचड यांचा पराभव केला आणि सर्वच्या सर्व जागा निवडून आणत अगस्ती कारखान्याची धुरा सिताराम पाटील गायकर यांच्याकडे देत त्यांनी अगस्तीची व्हाईस चेअरमन या पदाची जबाबदारी स्वीकारली तोट्यात असणाऱ्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नातील एक साथीदार गमावल्याची हळहळ अकोले तालुक्यात व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात बंधू दिलीप भांगरे पत्नी जिल्हा परिषद सदस्या सुनीताताई भांगरे मुलगा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमित भांगरे दोन मुली असा परिवार आहे

शुक्रवार दि 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शेंडी(भंडारदरा) येथे त्यांच्या पार्थिवावर हाजारो चाहत्यांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले यावेळी माजी मंत्री मधूकररराव पिचड, वैभव पिचड यांच्या सह आमदार, डॉ किरण लहामटे , सीताराम पाटील गायकर, सत्यजित तांबे ,डॉ राजेंद्र विखे मधुकर नवले, डॉ अजित नवले ,यांचे सह तालुका व जिल्हा भरातून हाजरो चाहते उपस्थित होते

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं , चांगला सहकारी गमावला
अशोकराव भांगरे यांची उणीव तालुक्याला, पक्षाला जाणवत राहील
— विरोधी पक्षनेते अजित पवार यांची श्रध्दांजली
“अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन अशोकराव भांगरे यांचं निधन हा मोठा धक्का आहे. त्यांच्या निधनाने अकोले तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, आदिवासी विकास, सहकार क्षेत्रातील लोकप्रिय, कर्तृत्ववान नेतृत्वं हरपलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपला नेता, आम्ही चांगला सहकारी गमावला आहे. अकोले तालुक्याची मोठी हानी झाली आहे. तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, आदिवासी बांधवांसाठीचं त्याचं कार्य, सहकार क्षेत्रातील योगदान कायम स्मरणात राहील. अशोकराव भांगरे यांची उणीव तालुक्याला, पक्षाला, आम्हा सर्वांना नेहमीच जाणवत राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अशोकराव भांगरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन श्रध्दांजली वाहिली.
—–///—–