स्त्रीने व्यक्तिमत्त्वाचा विकास साधन्या बरोबरच निर्भय होणे गरजेचे” – अॅड. रंजना गवांदे

“संगमनेर प्रतिनिधी
नूतन कला महाविद्यालय राजापूर येथे दि. १०,जानेवारी, २०२३ रोजी सा. फुले पुणे विद्यापीठ पुणे, विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान अंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अॅड. रंजना गवांदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
“स्त्री व्यक्तिमत्व विकासातील वैज्ञानिक दृष्टिकोनाची भूमिका” या विषयावर मार्गदर्शन करताना अॅड. गवांदे यांनी स्त्रीने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साध्य करणे गरजेचे आहे हे विविध दाखले देऊन विद्यार्थीनींना व्यक्तिमत्व विकासाची गरज आणि निर्भय व सक्षम बनण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.शि. संस्थेचे संचालक अॅड. बाबासाहेब गायकर तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे स्कूल कमिटी चेअरमन मा. भाऊसाहेब हासे साहेब उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कडलग सर यांनी केले. त्यांनी विद्यार्थीनींना व्यक्तिमत्व विकासासाठी वैज्ञानिक दृष्टिकोना बरोबरच अध्यात्म आणि विवेकाची जोड हवी असे मत व्यक्त केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार वि.वि. अधिकारी डॉ. प्रवीण आहेर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमारी अनुजा घोलप हिने केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.