इतर
सर्वोदय विद्यामंदिर राजुर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

अकोले प्रतिनिधी
सर्वोदय विद्यामंदिर राजुर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री गहिरे सर होते
दीप प्रज्वलन करुन क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याची ओळख करून देत विविध विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याबद्दल भाषणे , ओवी म्हणत आपले मनोगत व्यक्त केले
तसेच श्री पाचपुते सर, श्री घाणे सर, सोनवणे मॅडम, वाळुंज मॅडम बिडवे मॅडम, प्रसिद्धी प्रमुख श्री लहामगे सर आदी शिक्षकांनी आपली मनोगत व्यक्त करत, या कार्यक्रमांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंची वेशभूषा परिधान केली होती त्या विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे देण्यात आले शेवटी श्री दिंडे सर यांनी आभार मानले वंदे मातरम घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला