माजी मंत्री गडाख यांचे सुपुत्र उदयन गडाख लवकरच विवाह बंधनात !

गडाख – घुले विवाहाची जय्यत तयारी
सोनई प्रतिनिधी
[ विजय खंडागळे]माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे ज्येष्ठ सुपुत्र युवा नेते उदयन गडाख हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे त्यांच्या शाही विवाहाची जय्यत तयारी सुरू आहे
मुळा उद्योग समूहाचे संस्थापक, जेष्ठ साहित्यीक व राजकिय नेते यशवंतराव गडाख यांचे नातू व राज्याचे माजी मंत्री आ.शंकरराव गडाख यांचे जेष्ठ पुत्र चिरंजीव युवानेते उदयन गडाख यांनी त्यांच्या विवाह निमित्ताने ग्रामदेवताचे पुजन कुटुंबातील सदस्य, मित्रमंडळी सोबत दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
२२ जानेवारी रोजी मुळा पब्लिक स्कुलच्या भव्य प्रांगणात माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या कन्या व माजी आ.नरेंद्र घुले यांची पुतणी डॉ. निवेदिता व माजी मंत्री आ. शंकरराव गडाख व माजी सभापती सौ.सुनीता गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख हे विवाहबद्ध होत आहेत. घुले परिवार व गडाख परिवार या निमीत्ताने एका नात्यात गुंफले जाणार आहेत. या सोहळ्यात मंत्री, आमदार, खासदार, दिग्गज नेते, उद्योजक, नातेवाईक, नेवासा, शेवगाव तालुक्यातील नागरिक, कार्यकर्ते, मोठया संख्येने शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. काही मान्यवर हेलिकॉप्टरने येणार असल्याची माहिती असून त्या दृष्टीने हेलिपॅड ची तयारी चालू असल्याचे समजते.
युवा नेते उदयन गडाख यांनी सोनई गावातील पावन गणपती, जगदंबा देवी, शनिशिंगणापूर येथील शनिदेवाची विधिवत पूजा करून आशीर्वाद घेतले.सोबत माजी सभापती सुनीता ताई गडाख यांच्या सह इतर सदस्य उपस्थित होते.
