कंत्राटी वीज कामगारांच्या मागण्याबाबत बैठक घेणार: ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आश्वासन

पुणे-बुधवार दिनांक 16 एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या ऊर्जा राज्यमंत्री मा.ना.मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांच्या सुचने नुसार वीज कंपनी प्रशासन व भारतीय मजदूर संघ अशी मीटिंग MSEB होल्डिंग कंपनीचे मुख्यालय HSBC बिल्डिंग फोर्ट मुंबई येथे झाली. या मीटिंगला भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष मा.ऍड.अनिल ढुमणे तसेच मुंबई भारतीय मजदूर संघाचे सचिव संदीप कदम आणि वायरमन ट्रेड चे अभ्यासक शुभम राठोड यवतमाळ हे उपस्थित होते.
विविध राज्यात शासनाच्या पारेषण कंपनी मध्ये वायरमन ट्रेड ला पद भरती मध्ये संधी मिळते ती महाराष्ट्रात मिळावी या करिता तातडीने या बाबत योग्य व सकारात्मक निर्णय घेऊन वायरमन ट्रेड ला तातडीने संधी उपलब्ध करून द्यावी. तसेच पारेषण कंपनीत कार्यरत अनेक वीज कंत्राटी कामगार यांना विविध पदांच्या भरती मध्ये वयात 43 वर्षापर्यंत शिथिलता मिळून त्यांना पुन्हा फॉर्म्स भरण्याची संधी शासनाने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली
गुरुवार दिनांक 1 मे 2025 रोजी असलेल्या महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिना पासून महापारेषण कंपनीचे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधील प्रकाशगंगा या मुख्यालया समोर संघटना व राज्यातील सर्व वायरमन उमेदवार व कार्यरत वीज कंत्राटी कामगार हे बेमुदत धरणे आंदोलन व आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे मंत्री महोदय यांना सांगण्यात आले
तिन्ही वीज कंपनीतील सर्व प्रकारच्या वीज कंत्राटी कामगारांच्या समस्या समजून घेण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघासोबत स्वतंत्र बैठक लवकरात लवकर आयोजित करून सर्व प्रलंबित समस्यांवर तोडगा काढून राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून द्यावा असे निवेदन देखील भारतीय मजूर संघाचे प्रदेशाध्यक्ष मा.ऍड.अनिल ढुमणे यांनी दिले लवकरच मीटिंग आयोजित केली जाईल असे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री .ना.मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी संघटनेला दिले असल्याचे संघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी सांगितले