इतर

नेप्ती गावाला केडगाव सबस्टेशन मधून वीज पुरवठा करा ग्रामस्थांचे महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन.

अहमदनगर -नेप्ती ( ता. नगर ) शिवारातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी सुजाता नगराळे अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण अहमदनगर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून रस्ता रोको चे निवेदन दिले .

सुरळीत विद्युत पुरवठ्यासाठी वारंवार मागणी करूनही आठ ते दहा दिवसापासून विद्युत पुरवठा कायम खंडित होत आहे. यामुळे गावांमध्ये ग्रामपंचायत मार्फत पाणी सोडण्यात अनेक अडचणी येत आहेत वीज पुरवठा खंडित होत असल्याने पंधरा ते वीस दिवसानी पाणी सोडण्याची वेळ आली आहे. महिलांना दळण आणण्यासाठी, शेतकऱ्याना जनावरांसाठी चारापाणी व विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होत आहे.

विजेबाबत संबंधित अधिकारी व वायरमन यांना फोन केला असता फोन घेत नाही किंवा उडवा उडवीची उत्तर देतात. गावामध्ये लहान मोठ्या चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे. या भागात गेल्या दहा दिवसापासून विद्युत पुरवठा बंद असून अंधारात राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. वारंवार मागणी करूनही काहीच उपयोग होत नाही.

येत्या आठ दिवसांमध्ये आमच्या गावचा विद्युत पुरवठा केडगाव सबस्टेशन मधून सुरळीत चालू करण्यात यावा.अन्यथा शेतकरी ग्रामस्थांच्या वतीने ११ ऑक्टोबर रोजी कोणती पूर्व सूचना न देता बायपास कल्याण रोड येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.

असा इशारा सरपंच संजय अशोक जपकर, उपसरपंच संजय आसाराम जपकर, मार्केट कमिटीचे माजी संचालक वसंत पवार ,माजी उपसरपंच शिवाजी होळकर, ग्रामपंचायत सदस्य संभाजी गडाख, रामदास फुले,सौरभ जपकर, बाबासाहेब होळकर, दादू चौगुले, फारुख सय्यद, बंडू जपकर ,एकनाथ जपकर,नितीन कदम, विजय गडाख, मल्हारी होळकर, शाम गडाख, प्रा.एकनाथ होले, विलास गडाख,राजू गडाख, रवी गायके माजी सरपंच दिलीप होळकर, सुधाकर कदम, भानुदास फुले, जालिंदर शिंदे, अतुल जपकर ,गोरख जपकर ,ज्ञानेश्वर जपकर ,अशोक जपकर, मच्छिंद्र होळकर यांनी दिला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button