इतर

शेणित येथे राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

एस के जाधव /कोकणवाडी

अकोले तालुक्यातील राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठोकळवाडी,शेणीत येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली

शिक्षक श्री विठ्ठल धांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर यांनी मान्यवरांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी ते म्हणाले,”की समाजातील स्त्री शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नीला शिकवून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या असंख्य अडचणीवर मात करून मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे शाळा सुरू केली. त्या जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी जात तेव्हा त्यांच्या अंगावर चिखल, माती, दगड फेकून लोक त्रास देऊ लागले जेणेकरून त्या शाळा बंद करतील परंतु सावित्रीबाईंनी शिक्षणाचे व्रतच घेतले होते. म्हणून आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. अगदी संरक्षण विभाग, पोलीस अधिकारी, आयपीएस अधिकारी महिला आहेत. एवढेच नाही तर सर्वोच्च राष्ट्रपती पद सुद्धा महिलांनी भूषविले आहे. राजकारणातही ग्रामपंचायत पासून विधानसभा, राज्यसभा येथे 50 टक्के महिला आघाडीवर आहेत याचे सारे श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते.


श्री विठ्ठल धांडे सरांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंचे कार्य, आदर्श विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे असे सांगून त्यांच्या अतुलनीय धैर्याला आणि त्यागाला त्रिवार अभिवादन केले.


यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री तुळशीराम गभाले, श्री भांगरे सर, महादर्पनचे प्रतिनिधी श्री संतु जाधव, घनश्याम नवले, तुकाराम बेनके, विजय बडे, नारायण धोंगडे, पोपट भांगरे संस्थेचे श्री विठ्ठल धोंगडे, मुरलीधर तळपे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री दातीर सर यांनी सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button