राष्ट्रवादी काँग्रेस डॉकटर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जगताप याची पारनेर मध्ये आढावा बैठक !

डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कावरे यांनी केला प्रदेशाध्यक्षांचा यथोचित सन्मान !
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
महाराष्ट्रातील आरोग्याच्या अनेक समस्यांबाबत महाराष्ट्रात एक आरोग्याची व्यापक चळवळ उभी राहावी म्हणून देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलची स्थापना करत महाराष्ट्रभर डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याचे काम यामागे सुरू आहे .राज्याचे डॉक्टरचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सुनिलजी जगताप यांची रविवारी महाराष्ट्र दौर्यावर असताना आरोग्य सेवेत राज्यात योगदान देणारे आ. निलेश लंके यांच्या मार्गदर्शना खाली कार्य करनारे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.बाळासाहेब कावरे यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली व जिल्ह्यातील विवीध प्रश्नावर चर्चा केली .
अहमदनगर जिल्हा डॉक्टर सेलचे अध्यक्ष बाळासाहेब कावरे यांनी यावेळी डॉक्टर जगताप यांचा यथोचित सन्मान करत अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य सेवे संदर्भातील विविध प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा करत जिल्ह्यातील प्रश्न समोर मांडले .
डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ . जगताप राज्यव्यापी दौऱ्यावर निघाले असताना मकर संक्रांतीच्या दिवशी या दौऱ्याचा शुभारंभ पारनेर तालुक्यातील सुपा येथे करण्यात आला .यावेळी डॉक्टर कावरे यांच्या समवेत तालुका डॉक्टर सेलचे तालुका अध्यक्ष सुभाषजी डेरे , डॉ . अरविंद नांगरे ,डॉ जितेंद्र खामकर , डॉ . बाळासाहेब आंधळे ,डॉ रमेश गवळी , डॉ धनंजय पठारे , डॉ . विलास काळे , डॉ .शत्रुघ्न मगर, नगरसेवक डॉ.सचिन औटी , सुभाष शिंदे , भुषण शेलार , श्रीकांत चौरे , राष्ट्रवादीचे पारनेर शहराध्यक्ष वैभव गायकवाड, उपाध्यक्ष रमीज राजे यांच्या सह विवीध पदाधिकारी या वेळी उपस्थित होते .