जादूगार पी.बी. हांडे जादू जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

अकोले प्रतिनिधी
ज्येष्ठ जादूगार, सामाजिक कार्यकर्ते जादूगार हांडे यांना नाशिक येथील औरंगाबादकर सभागृहात आंतरराष्ट्रीय जादूगार स्नेहल इंद्रजीत (ऑस्ट्रेलिया )यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत मॅजिक क्लब ऑफ इंडिया चा जादु जीवन गौरव पुरस्कार 2023 देऊन सन्मानित करण्यात आले .
जादुगार हांडे यांनी 47 वर्षाच्या जादु कारकिर्दीत पाच हजारापेक्षा जास्त जादूचे प्रयोग करून शेकडो सामाजिक संस्थांना कार्यक्रमाद्वारे आर्थिक मदत मिळवून दिली आहे तसेच जादु मनोरंजनाबरोबर प्रबोधन केले आहे .
ते गेली 33 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रभावी काम करत आहेत रहस्य चमत्काराचे” या अंधश्रद्धा निर्मूलन सप्रयोग व्याख्यानचे महाराष्ट्रात जादूगार हांडे व मंदाकिनी हांडे यांनी 800 च्या वर व्याख्यान कार्यक्रम सादर करून समाजामध्ये अंधश्रद्धा ,अनिष्ट रूढी, परंपरा ,कर्मकांडे यामुळे होणारे आर्थिक नुकसान टळावे व शोषण थांबावे म्हणून सतत प्रबोधन करत आहेत .
राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांनी खोपोली ते पनवेल 35 किलोमीटर अंतर डोळ्यावर पट्टी बांधून मोटरसायकल चालवण्याचा धाडसी उपक्रम केला या उपक्रमाची जागतिक विक्रमात नोंद झाली .मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड (राष्ट्रीय )मॅजिशियन ऑफ द इयर तसेच जादू कला व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय तसेच जागतिक इ. 130 पुरस्कार प्राप्त झाले आहेत जादूगार पी.बी.हांडे सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवीत असतात.
सदर कार्यक्रमास संस्था अध्यक्ष महेंद्र देशपांडे ,अभिनेत्री स्मिता प्रभू, मा. दिनकर अण्णा पाटील, उद्योजक दिनेश शिरसागर ,अभिनेत्री मेघा पाटील ,उद्योजिका शबनम खान इत्यादी मान्यवर उपस्थित होते . जादू जीवनगौरव पुरस्कार 2023 मिळाल्याने त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.