जिल्हा परिषद प्राथमिक् शाळा पानेगाव (ता नेवासा) येथे मुलांना वह्या व पेन्सिल देऊन वाढदिवस केला साजरा

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चा चे अहमदनगर उत्तर चे जिल्हा सचिव महेश भाऊ पवार यांचा वाढदिवस मंगळवारी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन साजरा केला
जिल्हा परिषद प्राथमिक् शाळा पानेगाव ता नेवासा येथे मुलांना वह्या व पेन्सिल देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला,अमळनेर येथील युवा नेतृत्व महेश पवार हे भाजपचे अहमदनगरचे उत्तर चे जिल्हा सचिव आहे,प्रत्येक वर्षी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते एक समाजिक उपक्रम राबवीत असतात,राजकारणाबरोबर समाजिक धार्मिक कामात देखील ते अग्रेसर असतात, राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याने समाजसेवेची आवड त्यांना आहे,त्याच्याच एक भाग म्हणून 100 मुला मुलींना वही व पेन पेन्सिल हे शालेय साहित्य देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला,त्यावेळी पाराजी भाऊ गुढदे,रवी सोनावणे,दत्तात्रय जंगले,प्रवीण धात्रक,किरण जंगले,शिक्षक वर्ग व गावातील जेष्ठ मंडळी तसेच युवा उपस्थित होते.