ग्रामीणमहाराष्ट्र
चिलेखनवाडी ग्रामपंचायत ने महावितरणकडून केली कर वसूली

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
चिलेखनवाडी येथील वीज महावितरणच्या वीज उपकेंद्राकडे मागील चार वर्षाचा थकीत मालमत्ता कर प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर वसूल झाला असून ग्रामपंचायतीस शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध झाला असल्याची माहिती सरपंच भाऊसाहेब सावंत यांनी दिली.
चिलेखनवाडी ता. नेवासा येथील महावितरण कंपनीचे ३३ / ११ के.व्ही. वीज उपकेंद्र आहे. ५७ आर क्षेत्रावर असणाऱ्या या उपकेंद्राकडे ग्रामपंचायतचा मागील चार वर्षाचा मालमत्ता कर थकीत होता..कर वसूलीसाठी ग्रामपंचायतने वेळोवेळी मागणी करूनही कर न भरल्याने ग्रामपंचायतने उपकेंद्र दोन वेळा सील केले होते. याबाबत महावितरणने ग्रामपंचायतने ठरवलेले दर व स्वीचयार्डचे मोजमापे यावर आक्षेप घेत गटविकास अधिकारी , नेवासा यांचेकडे अपील करून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी उपकेंद्राच्या निसिध्द क्षेत्रात प्रवेश करून बेकायदा प्रवेश केल्याने त्यांचेवर गुन्हे दाखल करण्याबाबत नेवासा पोलिस ठाणेत तक्रार दाखल केली होती.ग्रामपंचायत आधिनियम १५८ क्र२९नुसार थकीत कर वसूली करण्यासाठी संबंधीताची मालमत्ता जप्त करून वसूल करण्याचा अधिकार असल्याचा खुलासा केला. यावर गटविकास अधिकारी यांनी दोन्ही बाजू ऐकूण घेत ग्रामपंचायतच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयानुसार ग्रामपंचायत ने नेवासा उपकार्यकारी अभियंत्यास तिसऱ्यांदा उपकेंद्र सील करण्याची नोटीस दिली दि. २४ जानेवारी रोजी सर्व पदाधिकारी कारवाई करण्यासाठी गेले असता महावितरणने थकीत कराची रु ६,३३,९५२.०० चा धनादेश वितरीत केला.
यासाठी किसान सभेचे ज्येष्ठ नेते कॉ. बाबा आरगडे, सरपंच संघटनेचे शरद आरगडे, गटविकास अधिकारी शेखर शेलार, विस्तार अधिकारी पाखरे साहेब, यांनी मध्यस्ती केली
याप्रसंगी उपसरपंच नाथा गुंजाळ, ग्रामसेविका कविता शिंदे, उप अभियंता विजय पाटील व बंगाळे साहेब ,ग्रा. प.सदस्य काका गायकवाड, देविदास सावंत, मधुकर काटे, भाऊसाहेब सरोदे, दिलीप कांबळे, उपस्थित होते.
चिलेखनवाडीला हिवरेबाजार सारखे आदर्श करायचे आहे. गावाच्या विकासासाठी सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख साहेब व जि.प. अध्यक्षा मा.ना. राजश्रीताई घुले पाटील हे वेगवेगळ्या माध्यमातून निधी देऊन गावाच्या विकासाला हातभार लावत आहे.
प्रा. भाऊसाहेब सावंत
सरपंच
ग्रामपंचायत , चिलेखन वाडी