इतर

विद्यार्थ्यांनी आयुष्याचं ध्येय निश्चित करून योग्य दिशेने मार्गक्रमण  करावे – निखिल भटनागर..!

अकोले प्रतिनिधी

 स्पर्धा परिक्षाविषयक योग्य दिशा, सातत्यपूर्ण प्रशिक्षण व पायाभूत सुविधांची मदत मिळाल्यास आदिवासी विद्यार्थी यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करतील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याचं ध्येय निश्चित करावे. योग्य दिशेने मार्गक्रमण केल्यास यश आपलेच आहे. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी,असे मत आयआयटी जेईईसाठी प्रशिक्षण देणारी भारतातील नामवंत संस्था फिटजी लि. पुणे केंद्राचे विद्यार्थी समन्वयक निखिल भटनगर यांनी केले 

  शुक्रवार दि.20 जाने.रोजी आयोजित एक दिवसीय चर्चासत्रात ते बोलत होते  

मवेशी (ता.अकोले.जि.अ.नगर) येथे इ.10,12 वी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आयोजित “आयआयटी जेईई व इतर परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन सत्रात”  श्री.भटनागर बोलत होते. 

सह्याद्री आदिवासी अ‍ॅग्रो फार्मर्स प्रोड्युसर कं. लि व आदिवासी विकास विभाग व फिटजी, लि. यांच्या संयुक्त विद्यमाने मवेशी येथे हे शिबीर घेण्यात आले. 

शिबीरामध्ये शासकीय माध्यमिक  आश्रमशाळा मवेशी, शासकीय इंग्रजी माध्यम माध्यमिक आश्रमशाळा राजूर कॅम्प मवेशी,आदर्श माध्यमिक आश्रमशाळा भंडारदरा कॅम्प मवेशी व एकलव्य रेसिडेन्सीयल स्कूल मवेशी  येथील 300 विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमासाठी शासकीय व अनुदान आश्रम शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व इतर कर्मचारी यांनी नियोजन केले होते. 

निखिल भटनागर यांनी विद्यार्थ्यांना देशभरातील महत्वाच्या स्पर्धा परिक्षांविषयी तपशीलवार मार्गदर्शन केले आणि सूचना दिल्या. त्यांनी जेईई ऍडव्हान्स, व्हीआयटीजेईई, बिटसॅट, एमएचटीसीईटी यांच्यासह इतर विविध स्पर्धा परीक्षांबाबत तपशीलवार माहिती दिली व प्रक्रियादेखील समजावून सांगितली. अर्ज भरणे, तयारी करणे याविषयी विद्यार्थ्यांच्या शंकांना फिटजीच्या तज्ञांनी उत्तरे दिली. कंपनीच्या वतीने प्रत्येक आश्रमशाळेसाठी मार्गदर्शन पुस्तक संच भेट देण्यात आला.

यावेळी सह्याद्री आदिवासी ऍग्रो फार्मर्स कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष रवींद्र तळपे,मुख्याध्यापक सर्व श्री.डाॅ.देवीदास राजगिरे,आदिनाथ सुतार, शिवराज कदम व.अंकुश चावडे यांच्यासह संकुलातील बहुतांश शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. एकात्मिक अधिकारी विकास प्रकल्प राजूर येथील प्रकल्प अधिकारी श्री. राजन पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात मान्यवरांंचे स्वागत डॉ.देवीदास राजगिरे यांनी केले.प्रास्ताविक श्री.शिवराज कदम यांनी केले. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.महेश सहाणे यांनी केले तर शेवटी आभार श्रीम.प्रमिला मतकर यांनी मानले.कार्यक्रमातुन फिटजी कंपनीतर्फे  आयोजित केल्या जाणार्‍या ऑनलाईन गणित मार्गदर्शनासाठी संकुलातील पन्नास विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्ष मार्गदर्शन केले जाणार असून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संंधी उपलब्ध  झाली असल्याचे मत श्री.आदिनाथ सुतार यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button