कळस बु येथील डॉ. चंद्रकला हासे – ढगे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड
अकोले प्रतिनिधी
कळस बु येथील डॉ. चंद्रकला हासे – ढगे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्र अभ्यास मंडळावर निवड झाले झाली आहे.
कळस बु येथे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे त्यांचे पती प्राचार्य शिवाजीराव ढगे यांचे समवेत सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र गवांदे, जय किसान दूध संस्था चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे, उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे, सदस्य दत्तात्रय वाकचौरे, पत्रकार अमोल वैद्य, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वर वाकचौरे माजी केंद्रप्रमुख अशोक ढगे, हरिश्चंद्र वाकचौरे, संभाजी वैद्य आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सौ. हासे या प्राध्यापिका म्हणून डॉ.बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी पुणे येथे कार्यरत आहे. तसेच पिंपळगाव पिसा येथील प्राचार्य मा. शिवाजीराव ढगे यांच्या सुविद्य पत्नी आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्री. शिवाजी ढगे व चन्द्रकला हासे या दाम्पत्य ने विद्यार्थी यांचे सोबत सवांद साधला. आमचे पण शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून विध्यार्थ्यांनी कुठलाही न्युनगंड न बाळगता कामा नये. मराठी माध्यमातिल विध्यार्थी यशस्वी होतात. असा सल्ला दिला. शाळेला आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले.
यावेळी विज्ञान गणित प्रदर्शन स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी स्वरीत रविराज बिबवे प्रथम क्रमांक विज्ञान ६वी ते ८ वी गट, गौरी विष्णू वाकचौरे प्रथम क्रमांक विज्ञान खुला गट, आर्या गोपीनाथ ढगे तृतीय क्रमांक गणित विषय ६ वी ते ८ वी गट शिक्षिका सौ. स्मिता सुधाकर धनवटे शैक्षणिक साहित्य प्राथमिक शिक्षक गट द्वितीय क्रमांक यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका संगीता दिघे यांनी केले. सुत्रसंचलन भागवत कर्पे यांनी तर आभार नामदेव निसाळ यांनी मानले.