१०५ वर्षाच्या कोंडाबाईंच्या हस्ते झाले जखणगावात झेंडावंदन !

दत्ता ठुबे
————-
नगर तालुक्यातील जखणगांव हे गांव संपूर्ण आरोग्य ग्राम म्हणून राज्य स्तरावर गाजत आहे . प्रजासत्ताक दिनी नियमानुसार सरपंचाचे हस्ते झेंडावंदन करण्याचे आदेश शासनाने काढले होते परंतु जखणगांव मध्ये जेष्ठ नागरिकांच्या हस्ते झेंडावंदन करून लोकनियुक्त सरपंच डॉ. सुनिल गंधे यांनी एक नवा आदर्श सुरु केला
ग्रामपंचायत कार्यालय येथे १०५ वय असुन सुद्धा आरोग्य दृष्ट्या तन्दुरूस्त असणार्या श्रीमती कोंडाबाई लहानु कर्डिले या सर्वात जेष्ठ महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ९९ वर्षांच्या श्रीमती दगडाबाई दशरथ भीसे यांच्या हस्ते तर जिल्हा बँक परिसरात श्री .सखाराम त्रिंबक कर्डिले या जेष्ठांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.कार्यक्रमाला सरपंच डॉ.सुनिल गंधे, चेअरमन बाळासाहेब कर्डीले,माजी सरपंच बी. आर.कर्डिले, साबीया शेख,स्नेहा काळे,प्रगती कर्डिले,नानी देवकर, गनी पटेल, मुजीब शेख, डॉ.राजेंद्र गंधे, फिरोज शेख, बाळासाहेब शहाणे,सुभाष सौदागर, पुणे जिल्हा ज्ञायाधीश सुहास दबडगांवकर,प्रा.सीमा पांडे यांचे सह असंख्य नागरिक उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती
यावेळी शाळेच्या मुलांचा भाषणाचा व मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडला. गणेश वाडी शाळेच्या आदिवासी मुलांनी सादर केलेल्या नृत्याला प्रेक्षकांनी विशेष दाद दिली.
सुत्रसंचालन बाळासाहेब वाबळे यांनी केले तर जालींदर नरवडे यांनी आभार मानले.