जिल्हयातील तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी विशेष प्रयत्न -ना.राधाकृष्ण विखे पाटील

अकोले ( प्रतिनिधी)-
जिल्ह्याला अध्यात्मिक वारसा खूप मोठा असल्याने प्रत्येक तिर्थक्षेत्राचे ठिकाणाचा विकास करून पर्यटन स्थळ करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
ब्राम्हणवाडा येथील दतनगर मधील देवस्थानच्या रोप्यमहोत्सवी अखड हरीनाम सप्ताहास मंत्री विखे पाटील यांनी भेट देवून भाविकांशी संवाद साधला.पंचवीस वर्षापासून अखंड हरीनाम सप्ताहाची परंपरा सुरू ठेवल्याबद्दल त्यांनी मंदीराचे विश्वस्त आणि ग्रामस्थांचे अभिनंदन केले.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे आखिल भारतीय सह मंत्री शंकर गायकर ,बजरंग दलाचे विवेक कुलकर्णी माजी आमदार वैभराव पिचड, भाजपाचे अकोले तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे ,संगमनेर तालुकाध्यक्ष सतीश कानवडे,जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर,ज्येष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ,गिरजाजी जाधव,राजाभाऊ देशमुख,सीताराम देशमुख,अकोले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष इंजि सुनील दातीर,सेक्रेटरी सुधाकर देशमुख, अमृतसागर चे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे,अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, भाजपच्या महिलाध्यक्षा रेश्मा गोडसे,ब्राम्हणवाड्याचे उपसरपंच सुभाष गायकर यांच्यासह भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,ब्राम्हणवाडा गावाला ऐतिहासिक वारसा आहे.दत्तवाडीचे नामकरण हे अध्यात्मामुळे झाले.25 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे.गावोगावी धार्मिक सोहळे होतात.याचे कारणच अध्यात्म आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला लाखो भाविक पायी जातात. गावोगावी ज्ञानोबा तुकोबाचा गजर सुरू असल्यानेच गावाचे सांस्कृतिक वातावरण टिकून असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री विखे म्हणाले की-आज सोशल मीडियामुळे माणुसकीचा ओलावा कमी होत चालला आहे.समाजातील सामाजिक एकता नष्ट होत चालली असताना.अध्यात्माची परंपरा जतन करणाऱ्या गावाचे गावपण टिकून ठेवण्याचे काम या निमित्ताने सुरू आहे.एकत्र व एकसंघ भावनेने आध्यत्मिक कार्यात जोडून घेतले तर हिंदू धर्माकडे वाकड्या नजरेन पाहाण्याची कोणी हिंमत करणार नाहीअसे ना विखे म्हणाले
अद्यात्माची भूमी जिल्ह्यात खूप मोठी आहे.शिर्डी,शिंगणापूर, अगस्ति आश्रम, अमृतेश्वर, हरिचंद्रगड, अनेक प्राचीन मंदिर आहेत.सर्व तीर्थक्षेत्रे चांगल्या सुविधांनी जोडणार आहोत.या भागाच्या विकासाला निधी कमी पडणार नाही याची ग्वाही ना.विखे पाटील यांनी दिली.अकोले तालुक्यतील शेतकर्याच्या कष्ठाला तोड नाही त्यामुळेच गावांचा चेहरा मोहरा आता बदलत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
शंकरराव गायकर यांनी आपल्या भाषणात ब्राम्हणवाडा येथील दत्तवाडी च्या अखंड हरिनाम सप्ताहाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.ज्ञानदानाचे कार्य आठवडाभर सुरू आहे.सर्वसामान्य माणूस एक वारकरी घडवतो.या भूमीत जन्माला येणे हे माझे भाग्य असल्याचे नमूद केले.
माजी आमदार वैभवराव पिचड यांनी आपले मनोगत व्यक्त करून या परीसराच्या विकासासाठी निधीची उपलब्धता करुन देण्याची मागणी केली.ग्रामस्थाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अमृतसागर चे संचालक रामदास आंबरे,आनंदराव वाकचौरे,गंगाधर नाईकवाडी,जगन देशमुख,सुभाष डोंगरे,भाऊसाहेब औटी,बबन चौधरी,
नगरसेवक शरद नवले,सागर चौधरी,जनाबाई मोहिते,तमन्ना शेख,माधुरी शेणकर,बाळासाहेब मुळे, प्रदिप भाटे,संदीपराव शेटे,सुधाकरराव आरोटे, भाऊसाहेब खरात,सुनील कोटकर,सोमदास पवार,अरुण शेळके,भाऊसाहेब रकटे,शंभू नेहे,सचिन शेटे,अमोल वैद्य, राज गवांदे,राजेंद्र देशमुख,धनंजय देशमुख,अनिल डोळस,अब्दुल इनामदार,शंकर घोलप,संजय लोखंडे,सनी घाटकर,ज्येष्ठ कार्यकर्ते देवराम गायकर,गोकुळ आरोटे,ज्ञानदेव गायकर,भगवान गायकर,संपत पाबळे,शांताराम गायकर,निलेश गायकर,आदी कार्यकर्ते , ग्रामस्थ व विशेषतः महिला मोठ्या संख्यने उपस्थित होत्या.
प्रास्ताविक ऍड अशोकराव गायकर यांनी केले.सूत्रसंचालन गणेश गायकर यांनी केले.