सुनील वेडे या आदिवासी तरुणाची राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई संघात निवड

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी बहुल अशा कोहणे गावातील एक होतकरू युवा क्रिकटपटू सुनील वेडे या तरुणाची नुकतीच राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धे साठी मुंबई संघात निवड झाली आहे.
सुनीलने दिव्यांग क्रिकेट प्रकारात अनेक स्पर्धामध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले आहे व राष्ट्रीय पातळीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
स्वतःची क्रिकेट किट असावी हे प्रत्येक क्रिकेपटूचे स्वप्न असते,तसे सुनीलचे ही होते,पण बेताच्या आर्थिक परिस्तिथी मुळे त्याला महागाची किट घेणे परवण्यासारखे नव्हते. ही गोष्ट मनसेचे अकोले तालुका संघटक योगेश कोंडार यांना समजताच त्यांनी तात्काळ सूनीलशी संपर्क साधला व त्याला एक प्रोफेशनल क्रिकेट किट भेट म्हणून दिली.
सुनीलने उत्तम कामगिरी करून देशात अकोले तालुक्याचे व आदिवासी समाजाचे नाव रोशन करावे अश्या शब्दात श्री योगेश कोंडार यांनी सुनीलला शुभेच्छा दिल्या व भविष्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी कोणतीही मदत लागल्यास सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.सुनील वेडेला केलेल्या मदतीबद्दल डिसीसीआय कार्यकारणी समिती सदस्य तथा डिफ्रेंटली एब्ल्ड क्रिकेट असोसिएशनचे सचिव श्री कलपेश गायकर यांनी आभार मानले आहेत