नाशिक पदवीधर साठी अकोल्यात पदवीधर मतदारांचा निरुत्साह! अवघे 49 टक्के मतदान

अकोले प्रतिनिधी
विधांनपरिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान झाले या मतदारसंघाच्या निवडणुकीत आज अकोले तालुक्यात 49.82 टक्के मतदान झाले
या निवडणुकीत अकोले तालुक्यात अकोले, समशेरपुर, विरगाव, कोतुळ,ब्राह्मणवाडा, राजुर, साकीरवाडी, शेंडी या ठिकाणी मतदान केंद्र होते
केंद्रनिहाय मतदान टक्केवारी पुढील प्रमाणे
समशेरपुर (42.48 टक्के) विरगाव( 47.96 टक्के) कोतूळ (58.54 टक्के ) ब्राह्मणवाडा (46.87 टक्के) राजूर (49.26 टक्के) साकीरवाडी( 40.18 टक्के ) शेंडी (50.27टक्के) अकोले शहरात तीन केंद्रावर अनुक्रमे 59.91टक्के 45.86 टक्के 48.68टक्के मतदान झाले नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात एकूण 16 उमेदवार निवडणूक रिंगणात होते परंतु खरी लढत महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे या दोघांत खरी लढत दिसून आली मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने या कमी टक्केवारीचा फायदा कोणाला होतो याकडे आता लक्ष लागले आहे
अकोले तालुक्यात 5678 पुरुष मतदार तर 2434 स्त्री मतदार असे एकूण 8 हजार 112 मतदार होते
त्यापैकी 3009 पुरुष मतदार तर 1032 स्त्री मतदार असे एकूण 4041 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
अकोले तालुक्यात एकूण 49.82% मतदान झाले उमेदवारांचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्यात कमी पडल्याने मतदानाची टक्केवारी घसरल्याचे चित्र दिसून आले 2 फेब्रुवारी2023 रोजी नाशिक येथे मतमोजणी होणार आहे
