मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे, उपाध्यक्षपदी ना. नरेंद्र पाटील तर सरचिटणीसपदी प्रकाश देशमुख यांची निवड

पंढरपूर – अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे, उपाध्यक्षपदी ना. नरेंद्र पाटील तर सरचिटणीसपदी प्रकाश देशमुख यांची निवड करण्यात आली.
पंढरपूर येथे अखिल भारतीय मराठा महासंघ सर्वसाधारण सभेत महासंघाच्या २०२२ ते २५ या सालाकरिता नविन कार्यकारिणी निवड करण्यात आली. निवड निर्णय अधिकारी अँड. प्रविण गोगावले हे होते. त्यांनी घोषित केली पुढील प्रमाणे कार्यकारणी अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, विभागीय उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील, सरचिटणीस प्रकाश वसंतराव देशमुख, कोषाध्यक्ष प्रमोद बळवंत जाधव, विभागीय चिटणीस अतिश गायकवाड
सदर निवडणूक प्रक्रियेस अखिल भारतीय मराठा महासंघाचे माजी अध्यक्ष शशिकांत पवार व काही व्यक्तीनी मुंबई सत्र न्यायालय व उच्च न्यायालय मुंबई येथे अर्ज केले होते. त्यास स्थागिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर २९ जानेवारी रोजी पंढरपूर येथे सर्वसाधारण सभा झाली त्यास राज्याच्या सर्व भागातून मोठ्या संख्येने सभासद व पदाधिकारी होते. त्यांनी एकमुखाने नवीन पदाधिकारी यांना मान्यता दिली. मुंबई उच्च न्यायालयात वकील अण्णासाहेब देसाई, शंतनू रक्ताडे, अमर परसेकर, यशवंत पवार, श्रीराम पिंगळे, रोहिणी पवार यांनी कामकाज पहिले.
नुतन राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी महासंघाची संघटनात्मक बांधणी करून ३ लाख कुटुंबा पर्यंत संपर्क साधनार असून महासंघ यापुढे मराठा समाजाचे आर्थिक प्रश्न, सामाजिक सलोखा, उद्योग, व्यवसाय, शिक्षण व कृषी याविषयावर मोठ्या प्रमाणावर काम करणार आहे असे सांगितले.