पोखरीकर ग्रामस्थांचे उपोषण आश्वासनानंतर मागे

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील पोखरी येथील सरपंचासह ग्रामस्थांनी सोमवारी सुरू केलेल्या उपोषनास भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या फोनवरील चर्चेनंतर
सभापती काशिनाथ दाते, राहुल शिंदे, सुजित झावरेंच्या शिष्टाईने उपोषणाची सांगता झाली. यानंतर पोखरी गावातील वादावर तुर्त पडदा पडला आहे.
या उपोषणाला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. यावेळी पारनेर चे नगराध्यक्ष विजय औटी यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, शिवसेना शहराध्यक्ष निलेश खोडदे, सभापती योगेश मते, नगरसेवक श्रीकांत चौरे, सरपंच पंकज कारखिले, सरपंच सतीश पिंपरकर, सरपंच निमसे यांच्या सह सर्व पक्षांनी पाठिंबा दिला . यावेळी सरपंच सतीश पवार, माजी सरपंच सोपान फडतारे, परसराम शेलार, आण्णा पवार, उपसरपंच सिताराम केदार, उपाध्यक्ष राजू पवार, सचिव बाळासाहेब शिंदे, निजाम पटेल, जयश्री शिंदे, बाळु पवार, अरुणराव ठानगे, किसन धुमाळ, अशोक खैरे, पंकज कारखिले, अमोल पवार, अशोक आहेर, दत्ता शिंदे, महादू पवार, नामदेव करंजेकर, रोहिदास शिंदे, शांताराम आहेर, दिलीप शिंदे, लहानू करंजेकर, रावसाहेब शिंदे, बाबाजी वाकळे, पप्पू करंजेकर यांसह पोखरी गावचे भजनी मंडळ मंदिर ट्रस्टचे सर्व संचालक व पोखरी गावचे नागरिक व महिला उपस्थितीत होते.
तालुक्यातील पोखरी येथील श्री रंगदास स्वामी देवस्थान ट्रस्ट येथील मंदिरात दि. २१ नोव्हेंबर २०२२ पासून गावातील शकुंतला किसन खैरे, लतिफ फत्तु पटेल, विनोद मारुती खैरे हे विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले . त्यांच्या उपोषणातील मागणी बाबत तहसीलदार
शिवकुमार आवळकंठे यांनी कार्यवाही केलेली आहे. तरीही उपोषणकर्त्यांनी आडमुठी भूमिका घेऊन गावास वेठीस धरण्याचा प्रयत्न चालू केला आहे. पोखरी गावचा सालाबाद प्रमाणे २ फेब्रुवारी २०२३ पासून श्री रंगदास स्वामींचा यात्रा उत्सव सुरू होत आहे. या यात्रेच्या निमित्ताने मंदिरात साफसफाई सूरु असून यात्रेचे नियोजनही तयार करावयाचे आहे. परंतु उपोषण कर्ते यामध्ये अडथळा निर्माण करत आहे. उपोषण करणारे शाकुंतला किसन खैरे, लतीफ फत्तु पटेल, विनोद मारुती खैरे यांना ट्रस्टचे उपाध्यक्ष राजू रखमा पवार व सचिव बाळू पांडुरंग खैरे यांनी मंदिर खाली करून आपण दिलेल्या पत्राप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषण
करण्याची विनंती केली. परंतु उपोषणकर्त्यांनी उलट उपाध्यक्ष व सचिव यांनाच अॅट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. त्यांच्या विरोधात
पोखरी गावातील २०० ते २५० लोकांनी सोमवारी पारनेर तहसील कार्यालय समोर उपोषण सुरु केले व मंदिर मोकळे करण्याकरिता पारनेर पोलीस ठाण्यात उपोषणकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. . दुपारी १ वाजता माजीसभापती काशिनाथ दाते सर, राहुल पाटील शिंदे व सुभाष दुधाडे उपोषण स्थळी तहसील कार्यालय समोर दाखल झाले उपोषणास पाठिंबा देऊन
उपोषणकर्त्यांसमवेत तहसीलदार शिवकुमार आवळकंठे
यांनी काशिनाथ दाते, राहुल शिंदे, सुभाष दुधाडे व देवस्थान ट्रस्टचे पदाधिकाऱ्यांना चर्चेस बोलावले.
प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांना राहुल पाटील शिंदे यांनी सर्व हकीगत सांगितल्याने तेही पारनेरला तहसील कार्यालय येथे हजर झाले. राहुल पाटील शिंदे यांनी
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,

खा. सुजय दादा विखे यांच्याशी संपर्क करून उपोषणाची कल्पना दिली व खासदार सुजय विखे यांनी प्रशासनास तातडीने दखल घेन्यास सांगितले. सभापती काशिनाथ
दाते सर, राहुल शिंदे, पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय ओटी, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, पी. आय. घनश्याम बळप यांनी चर्चा करून मंदिरात
उपोषणास बसलेल्यावर कारवाई करण्याचे ठरवले व त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घेतला. दुपारी ४.३० वा. माजी उपाध्यक्ष सुजित झावरे उपोषणस्थळी दाखल झाले
त्यांनीही भ्रमणध्वनीवर खासदार सुजय विखे यांच्याशी संपर्क केला. उपोषणास शिवसेना तालुकाप्रमुख
डॉ. श्रीकांत पठारे, शहर प्रमुख निलेश खोडदे, नगरसेवक
भाऊ ठुबे, ऋषि गंधाडे यांनीही उपस्थितीत राहून पाठिंबा दिला.

•यापूर्वी २५ जानेवारीला सकाळी ११ ते २ या कालावधीसाठी सदर मंदिरात जाऊन उपोषणकर्त्या महिला शकुंतला खैरे, लतिफ पटेल व इतर यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. समस्यांवर कारवाई केलेली आहे अशी परिस्थिती असतानाही सदर व्यक्तींनी उपोषण सोडले नसल्याने सामाजिक सलोखा बिघडत आहे. त्यांचे विरोधात तक्रार असल्याने
पोलीस प्रशासन कारवाई करतील.शिवकुमार आवळकंठे, तहसीलदार पारनेर
पोलीस प्रशासनातर्फे ४४१ चा गुन्हा दाखल करतोय, कारण ती जागा देवस्थान ट्रस्टची आहे. देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष यांनी फिर्याद दिली आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.
-घनश्याम बळप, पोलीस निरीक्षक पारनेर