सुपा येथील नगर पुणे महामार्गावरील व पारनेर-सुपा रोडवरील अतिक्रमणाला पाठबळ कोणाचे ?

दत्ता ठुबे
पारनेर:-नगर पुणे महामार्गावर होत असलेले अपघात नैसर्गिक नसुन मानव निर्मीत आहेत, याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश पवार यांनी केला आहे
त्यांनी म्हटले आहे की हे अतिक्रमण काढण्यासाठी
पारनेरचे प्रांत अधिकारी सुधाकर भोसले तसेच पारनेरचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे ,सुपा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करुन तब्बल तीन वेळा बैठका घेतल्या. मात्र कार्यवाही झाली नाही यासाठी कोणाचा दबाव आहे का हे जनतेला समजू द्या
अनाधिकृत बांधकाम काढण्यासाठी नेमका दबाव कोणाचा आहे ? जो कोणी लोकप्रतिनिधी अनाधिकृत बांधकाम काढण्यासाठी विरोध करत असेल त्यालाच महामार्गावरील मुत्युस कारणीभूत धरायला हवे
दोन वर्षांपूर्वी पारनेर येथे सर्व सामान्य जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही राजकीय दबावाला भिक न घालता सिंघम स्टाईल तहसीलदार ज्योती देवरे यांनी खमकी भुमिका घेऊन पारनेर बस स्टॉप सह पारनेर पोलिस स्टेशन तसेच तहसील कार्यालयाच्या आजुबाजुला असले ल्या सर्व अनाधिकृत बांधकामावर बुलडोजर फिरवला जे एका महिला अधिकार्याने ने करुन दाखवलं ते अाता पारनेर प्रांत अधिकारी सुधाकर भोसले आणि तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी राजकीय दबावाला बळी न पडता सर्व सामान्य जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेचे असलेले
पारनेर -सुपा येथील। नगर पारनेर व पारनेर सुपा रस्त्या वरील अनधिकृत बांधका विरोधात खमकी भूमिका घ्यावी असे आवाहन मनसे माथाडी कामगार सेना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष.अविनाश पवार यांनी केले आहे