आजचे पअंचांग व राशिभविष्य दि २१/११/२०२४

: 🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक ३० शके १९४६
दिनांक :- २१/११/२०२४,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:४०,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५०,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- कार्तिक
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- षष्ठी समाप्ति १७:०४,
नक्षत्र :- पुष्य समाप्ति १५:३६,
योग :- शुक्ल समाप्ति १२:०१,
करण :- विष्टि समाप्ति २९:३०,
चंद्र राशि :- कर्क,
रविराशि – नक्षत्र :- वृश्चिक – अनुराधा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०५प. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०१:३९ ते ०३:०२ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:४० ते ०८:०४ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:१५ ते ०१:३९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०१:३९ ते ०३:०२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:२६ ते ०५:५० पर्यंत,
❀ दिन विशेष:-
गुरुपुष्यामृत सूर्योदयापासून १५:३६ प., धनुरयन २५:२६, दग्ध १७:०४ प., भद्रा १७:०४ नं. २९:३० प.,
————–
: 🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक ३० शके १९४६
दिनांक = २१/११/२०२४
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)
मेष
मनाची चलबिचलता जाणवू शकते. लहान प्रवास चांगला होईल. भावंडांची उत्तम साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.
वृषभ
आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. विचारांना अधिक चालना देऊन पहावे. मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
मिथुन
उगाच कोणाच्या भरवश्यावर राहू नका. आवश्यक त्या गोष्टी समजावून घ्या. कार्यालयीन सहकार्यांची मदत मिळेल. नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल. व्यावसायिक गोष्टीत याच उपयोग होईल.
कर्क
जुन्या दुखण्यांना गांभीर्याने घ्या. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील. भावनेला आवर घालावी लागेल. घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवा. कामातील निर्णय योग्य ठरतील.
सिंह
अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा. इतरांच्या मनीचे गुज जाणून घ्या. संमिश्र घटना घडू शकतात. मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक वातावरणात रमाल.
कन्या
काही गोष्टी नरमाईने घ्या. भडक मत दर्शवू नका. तडजोडीने मार्ग काढावा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. कामाची धांदल उडू शकते.
तूळ
अहंकाराला खतपाणी घालू नका. बोलतांना इतरांच्या भावनेचा विचार करावा. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. मदतीला मागे हटु नका. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.
वृश्चिक
क्रोधवृत्तीला आवर घालावी. अचानक धनलाभ संभवतो. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. मौल्यवान वस्तु जपून ठेवा. अति विचार करू नका.
धनू
पराक्रमाला वाव आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कामातून इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते. तरूणांकडून नवीन विचार जाणून घ्याल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल.
मकर
कामातून समाधान लाभेल. नातेवाईक भेटतील. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. वडीलांचे सहकार्य मिळेल.
कुंभ
कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या खोडकरपणात रमून जाल. दिवस खेळीमेळीत जाईल.
मीन
काहीशी मानसिक शांतता लाभेल. कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका. घरगुती वातावरण हसते-खेळते राहील. जोडीदाराची चंगाली साथ मिळेल. भागीदारीत फार विसंबून राहू नका.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर