त्या कंत्राटी कामगारांना कामावर घेण्याचे अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांचे आदेश!

पुणे दि २०
वीज मंडळ शिकाऊ उमेदवार संस्था सातारा या कंत्राटदाराला महावितरणच्या 6 वीज कंत्राटी कामगारांना कामावर घेण्याचे आदेश पुणे अप्पर कामगार आयुक्त मा.शैलेंद्र पोळ यांनी नुकतेच झालेल्या त्रिपक्षीय बैठकी त दिले आहेत.
महावितरण व्यवस्थापणाच्या सुचना नसतांना बेकायदेशीर पणे या कामगारांना केवळ आर्थिक अफरा तफरीची तक्रार पोलिसात केल्याच्या आकस व सूड भावनेने कंत्राटदाराने कामावर घेतले नव्हते. संघटनेने पत्र व्यवहार व आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला असता अखेर हा आदेश देण्यात आला.
सदर बैठकीला पुणे अप्पर कामगार आयुक्त मा.शैलेंद्र पोळ, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांच्या वतीने उपमहामंत्री राहुल बोडके, कामगार प्रतिनिधी दिलीप शिंदे व सीमा कदम, महावितरण कंपनी तर्फे शिरीष काटकर व शालिवाहन भोसले व कंत्राटदार सोमनाथ गोडसे उपस्थित होते.
या आदेशाचे पालन न झाल्यास कंत्राटदाराला कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा अप्पर कामगार आयुक्त यांनी महावितरण ला दिला आहे.
या आदेशाचे पालन संबंधित कंत्राटदार कंपनी व महावितरण प्रशासनाच्या वतीने केले नाही तर प्रशासना च्या कार्यालय समोर आंदोलन चालू करण्याचा ईशारा महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला आहे .