मारुतराव घुले पाटील जयंती निमित्त पशुपालक व विद्यार्थी मेळाव्यास प्रतिसाद

माका प्रतिनिधी
लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या जयंती निमित्त जिजामाता पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका,भेंडा व कृषि विज्ञान केंद्र दहीगाव-ने यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयामध्ये पशुपालक व विद्यार्थी मेळावा संपन्न झाला.
सदर मेळाव्यास डॉ. वाहणे जनरल मॅनेजर (NDDB, राहुरी ) ,श्री.रविंद्र नवले (युवा उद्योजक), श्री.महादेव ढाकणे ((M.D) कपिला पशु आहार यांचे पशुपालकांना व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून पशुपालन व्यवस्थापन,कृत्रिम रेतन संकलन,प्रजनन,पशु आहार व व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.कौशिक ( प्रमुख शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव –ने ), प्रा.भारत वाबळे सर (प्रशासकीय अधिकारी ) उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.चंद्रशेखर गवळी सर तसेच आभार प्रदर्शन विद्यालयाचे प्राचार्य प्रा.सोपान मते यांनी केले.