अर्थ ‘अर्थसंकल्पाचा’ यावर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांचे व्याख्यान

नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि आंबड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अर्थ अर्थसंकल्पाचा’ यावर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांचे बुधवारी (दि.८) रोजी सायंकाळी साडेपाच वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात अर्थसंकल्पचा समाजातील वेगवेगळ्या स्थरांवर होणार परिणाम, तर्क-वितर्क व प्रमुख वैशिष्ठ्ये विनायक गोविलकर समजावून सांगणार आहेत. गंजमाळ रोटरी येथील रोटरी सभागृहात होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून जास्तीत जास्त नाशिककरांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष सीए प्रफुल बरडिया आणि रोटरी क्लब ऑफ अंबडचे अध्यक्ष नितीन थोरात, सचिव ओमप्रकाश रावत, मंथ डायरेक्टर सतीश मंडोरा व मंथ लीडर डॉ. अक्षिता बुरड आणि रागिणी कुलकर्णी आदींनी केले आहे.